गडचिरोली:- गडचिरोली जिल्हा पोलीस शिपाई भरती 2022-2023 करीता उमेदवारांची दिनांक 21/06/2024 ते 13/07/2024 रोजी मैदानी चाचणी पोलीस मुख्यालय, कवायत मैदान गडचिरोली येथे घेण्यात आलेली होती. पोलीस शिपाई भरती -2022-2023 करीता महाराष्ट्र शासन, अधिसुचना गृह विभाग, दिनांक 23 जुन 2022 अन्वये शारीरिक चाचणीत किमान 50 टक्के गुण प्राप्त करणारे उमेदवार संबंधीत प्रवर्गामधील जाहिरातीत नमुद केलेल्या रिक्त जागांच्या 1:10 या प्रमाणात लेखी चाचणी करीता पात्र राहतील. पोलीस शिपाई भरती -2022-2023 मध्ये लेखी परिक्षेकरीता पात्र असलेल्या उमेदवारांची यादी सोमवार, दिनांक 22/07/2024 रोजी पोलीस अधीक्षक, गडचिरोली यांचे www.gadchirolipolice.gov.in या संकेतस्थळावर उमेदवारांच्या माहितीकरीता प्रसिध्द करण्यात येत आहे.
Also Read:- लेखी परीक्षेकरिता तयार करण्यात आलेली उमेदवारांची तात्पुरती निवड यादी Download
प्रसिध्द करण्यात आलेल्या उमेदवांराच्या यादीमध्ये उमेदवारांना काही आक्षेप असल्यास उमेदवारांची यादी प्रसिध्द झाल्याच्या वेळेपासुन ते मंगळवार, दिनांक 23 जुलै 2024 चे सायकांळी 18:00 वाजेपर्यत पोलीस अधीक्षक कार्यालय, गडचिरोली येथील समाधान कक्ष येथे व्यक्तीगतरित्या हजर राहुन किंवा आपण आवेदन अर्ज सादर करताना दिलेल्या ईमेल आयडी वरून या कार्यालयाची ईमेल आयडी sp.gadchiroli@mahapolice.gov.in यावर आक्षेप नोदंवु शकता. मंगळवार, दिनांक 23 जुलै 2024 चे सायकांळी 18:00 वाजेनतंर प्राप्त होणारे कोणतेही आक्षेप स्विकारले जाणार नाही याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी. पोलीस शिपाई पदाची लेखी परिक्षा रविवार दिनांक 28 जुलै 2024 रोजी घेण्यात येणार आहे. पात्र उमेदवारांना परिक्षा केंद्र, पेपर कालावधी व उपस्थितीची वेळ ई-मेल व मॅसेजगवारे कळविण्यात येईल.
उमेदवारानी कुठल्याही प्रलोभन किंवा आमिशाला बळी पडु नये तसेच कोणतीही व्यक्ती अथवा संस्था आमिश किंवा प्रलोभन देत असेल तर पोलीस अधीक्षक कार्यालय, गडचिरोली येथील समाधान कक्ष यांचे दुरध्वनी कमांक 8806312100 यावर तसेच उपविभागीय पोलीस अधीकारी कार्यालय / पोस्टे / उपपोस्टे / पोमके / पोलीस मुख्यालय येथे संपर्क साधावा.
Police Bharati Group Join whatsup