प्रेम प्रकरणातून तरुणीची निर्घृण हत्या #raigad #murder

Bhairav Diwase
रायगड:- प्रेम प्रकरणातून तरुणीची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. ही घटना रायगड जिल्ह्यातील उरण येथील एन आय स्कूलजवळ घडली. यशश्री शिंदे (वय 22) असे हत्या झालेल्या तरुणीचे नाव आहे. हत्येनंतर आरोपी पळून गेला आहे. या घटनेमुळे उरण तालुक्यात खळबळ उडाली आहे. प्राथमीक माहितीनुसार प्रेम प्रकरणातून ही घटना घडल्याचे बोलले जात आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, यशश्री शिंदे मागील 2 दिवसांपासून (25 जुलै) बेपत्ता झाली होती. तिचा मृतदेह आज कोटनाका पेट्रोल पंपाजवळ छिन्नविच्छिन्न अवस्थेत आढळला. या घटनेची पोलिसांना शनिवारी पहाटे माहिती मिळाली. त्यानंतर त्यांनी लगेच घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेऊन इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयात पाठवला. पोलिस आरोपीला लवकरच अटक करतील. पण नागरिकांनी पोलिस यंत्रणेला सहकार्य करावे, असे आवाहन उरण पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र कोते यांनी केले.