मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना

Bhairav Diwase

मुख्यमंत्री माझा भाऊ
मी त्याची लाडकी बहीण
देई बहिणीस रुपये पंधराशे
 त्यास करी ती औक्षवण...

चार दिवस आधी दिले
 रक्कम थेट खात्यात
असंच गोडवा राहू दे
 बहिण भावाच्या नात्यात...

दादा, भाऊजीचा आहे
या पैशावरच डोळा
दारूच्या व्यसनातूनच
होताहे संसाराचा वाटोळा...

 भाच्याच्या शिक्षणास
 पैसा लागत आहे लई
योजनेची उतळ्घाईने
वाढत आहे महागाई....

उज्वल विजय त्रिनगरीवार
 रा.गोंडपिपरी जिल्हा चंद्रपूर
मो. नं. +918888959455