गडचिरोली:- गडचिरोलीमधून एक संतापजनक घटना समोर आली आहे. यामध्ये मोबाईल चार्जर न दिल्याच्या कारणावरून रेस्टॉरंट मध्ये काम करणाऱ्या एका 19 वर्षीय तरुणीला बेदम मारहाण करण्यात आली आहे. ही मारहाणीची घटना त्या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर लोकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
आरमोरी शहरातील वडसा टी पॉईंट येथील एका रेस्टॉरंट मध्ये सोहेल शेख हा आपल्या पत्नीसोबत नाश्ता करण्यासाठी आला होता. कामानिमित्त तो बाहेर निघून गेल्यानंतर त्याच्या पत्नीने रेस्टॉरंटच्या काउंटरवर असलेल्या मुलीला चार्जर मागितला. मात्र तिने देण्यास नकार दिल्याने ही बाब आपल्या पतीला तीने सांगितली. तिथे लगेच पती सोहेल आला आणि त्या मुलीला बेदम मारहाण केली.
यादरम्यान त्याने आपला मित्र अयुब शेख याला ही बोलावलं. तेव्हा त्यांनीही मुलीला लथाबुक्क्यांनी मारहाण केली. मुलीच्या तक्रारीवरून आरमोरी पोलिसांनी सोहेल शेख आणि अयुब शेख या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.