गडचांदुर येथे आम आदमी पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन सुरजभाऊ ठाकरे यांच्या हस्ते संपन्न.
गडचांदूर:- राजुरा विधानसभा क्षेत्रातील जनतेच्या विविध समस्यांचे निवारण करण्याकरिता राजुरा येथील आम आदमी पार्टीच्या जनसंपर्क कार्यालयानंतर आज दिनांक- 05/ऑगस्ट/2024 रोजी गडचांदूर येथील बस स्टॉप परिसरामध्ये आणखी एका आम आदमी पक्ष जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन हे राजुरा विधानसभा क्षेत्रामधील धडाडीचे नेते श्री. सुरजभाऊ ठाकरे कामगार जिल्हाध्यक्ष तथा उपजिल्हाध्यक्ष, आम आदमी पार्टी, चंद्रपूर यांच्या हस्ते समस्त कार्यकर्ते तथा सहकाऱ्यांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले. या ठिकाणी कार्यालय उघडण्यामागची एकमेव कारण म्हणजे कोरपना तालुक्यातील गडचांदूर शहरासह शहराच्या सभोवताल असलेल्या सिमेंट कंपन्या तथा कोळसा खाणीनीं कंपन्यांनी वेढा घातला असल्याने या ठिकाणी कामगारांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने श्री. सुरजभाऊ ठाकरे यांचा चाहता वर्ग मोठ्या प्रमाणात असून 2009 पासून कामगारांच्या समस्यांचे निवारण करणारे एकमेव नेते श्री. सुरजभाऊ ठाकरे असल्याने कामगार शेतकरी तथा मोठ्या प्रमाणावर बेरोजगार युवा वर्ग यांच्या आग्रहास्तव श्री. सुरजभाऊ ठाकरे यांनी या सर्वांना त्यांचे हक्क व न्याय मिळावा यासह जनतेच्या विविध समस्यांचे निवारण व्हावे या उद्देशाने आज गडचांदूर येथे आम आदमी पक्ष जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन केले. या उद्घाटन सोहळ्याला कार्यालयाचे कार्यालय प्रमुख श्री. मिलिंद सोनटक्के शहर अध्यक्ष गडचांदूर (आप),गडचांदूर शहराध्यक्ष मिलिंद सोनटक्के, सुनील राठोड आप तालुका अध्यक्ष जिवती, आसिफ हुसेन शेख, राजू चौधरी, प्रशांत गिरसावडे, आशिष आगरकर, कुमार कोचेवाड, विजय टेकाम, अनिकेत मेश्राम, निखिल बाजाईत, राहुल चव्हान, निखिल पीदूरकर, प्रथम तेलंग, धनराज भगत, राहुल गोरे सुनील आडे, राहुल कांबळे, जावेद शेख, नागेश फटे, दिनेश सोनटक्के, प्रमोद मडावी, सुनील आडे, सुनील येमुरले, दत्ता किन्नाके, तुषार नीटकर, सुनील तेलंग, प्रजय भगत, स्वयमदीप भगत, ओम किचेकर, सचिन सिडम, शत्रु ठमके, श्याम ठमके, शंकर टेकाम, विकी मेळावार, सत्यवान गेडाम, विनोद काकडे, बादल गेडाम आदी कार्यकर्ते तथा सहकारी उपस्थित होते.