सर्वोदय शिक्षण मंडळाचे अरविंद पोरेड्डीवार नवे अध्यक्ष #chandrapur #gadchiroli

Bhairav Diwase
0
चंद्रपूर:- सर्वोदय शिक्षण मंडळाच्या अध्यक्षपदी अरविंद सावकार पोरेड्डीवार यांची, तर कार्याध्यक्षपदी आमदार किशोर जोरगेवार यांची एकमताने निवड करण्यात आली. सर्वोदय शिक्षण मंडळाच्या अध्यक्ष सुधा शांताराम पोटदुखे यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या अध्यक्षपदाच्या निवडीसाठी ३१ जुलै रोजी सर्वोदय शिक्षण मंडळाच्या कार्यालयात कार्यकारिणीची एक बैठक पार पडली. या बैठकीमध्ये सर्वोदय शिक्षण मंडळाच्या कार्यकारिणी मंडळाच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची एकमताने निवड करण्यात आली.

सभेला उपस्थित सर्व सदस्यांनी अध्यक्षपदी अरविंद सावकार पोरेड्डीवार, कार्याध्यक्षपदी आमदार किशोर जोरगेवार, उपाध्यक्षपदी सगुणा तलांडी, तर कोषाध्यक्षपदी संदीप गड्डमवार या पदाधिकाऱ्यांची निवड केली. कार्यकारिणी सदस्यांमध्ये चंद्रशेखर वाडेगावकर, जिनेश पटेल यांची निवड करण्यात आली. या सभेला उपाध्यक्ष सुदर्शन निमकर, सचिव प्रशांत पोटदुखे, सहसचिव डॉ. कीर्तिवर्धन दीक्षित, ज्येष्ठ कार्यकारिणी सदस्य सुरेश पोटदुखे व कार्यकारिणी सदस्य राकेश पटेल उपस्थित होते. दरम्यान, कार्यकारिणीने दिलेली मुळे जबाबदारी सर्वांच्या मदतीने यशस्वीपणे पुढे नेऊ, असा विश्वास नव्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी व्यक्त केला.

अध्यक्षांचा सत्कार सोहळा व परिचय संवाद
आज दि 2 ऑगस्टला सरदार पटेल महाविद्यालयात नवे अध्यक्ष अरविंद सावकार पोरेड्डीवार यांचा सत्कार सोहळा अब्दुल शफी सभागृह येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी महाविद्यालयातील प्रत्येक विभाग प्रमुखांचा परिचय करून देण्यात आला.

मार्गदर्शन व‌ वृक्षारोपण कार्यक्रम
सर्वोदय शिक्षण मंडळ संचालित सरदार पटेल महाविद्यालय चंद्रपूर राष्ट्रीय सेवा योजना विभाग द्वारा "एक पेड माँ के नाम" अंतर्गत महाविद्यालयाच्या परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आले. तसेच "तरुणाईची भरभराट" Flourishing of Youth या विषयावर मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रमुख अतिथी तथा मार्गदर्शक मा. श्री अमृत बंग, या कार्यक्रमाला संस्थेचे नवनियुक्त अध्यक्ष मा. श्री अरविंद सावकार पोरेड्डीवार, सचिव श्री प्रशांत पोटदुखे, सदस्य श्री जिनेश पटेल, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रमोद एम. काटकर, उपप्राचार्य डॉ. स्वप्नील माधमशेट्टीवार, रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. कुलदीप आर. गोंड, डॉ. उषा खंडाळे, डॉ. पुरुषोत्तम माहोरे, डॉ. वंदना खंडके, डॉ. निखिल देशमुख, डॉ. राजकुमार बिरादार, प्राध्यापकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि रासेयोचे स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)