युवा सेनेच्या (उबाठा) जिल्हाप्रमुखासह दोघांना अटक
चंद्रपूर:- युवासेनेचा (उबाठा) पदाधिकाऱ्या घरातून 40 जिवंत काडतूस, तलवार, वाघनख,सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. विक्रांत सहारे असे आरोपीचे नाव आहे. ही कार्यवाही शुक्रवारच्या मध्यरात्री शहर पोलिसांनी केली. चंद्रपूरात गोळीबारच्या घटनेत वाढ झाल्याचे भयावह चित्र निर्माण झाले आहे. दोन दिवसापूर्वी कंबरेला देशीकट्टा लटकवून फिरणाऱ्या युवकाला पोलिसांनी अटक केली होती. शहरात सापडून येणाऱ्या शस्त्रांमुळे शहरवाशीय भयभीत झाले आहे.
प्राप्त माहितीनुसार, शहरातील बाबूपेठ येथील निलेश पराते, मनोज कुलटवार हे दोघे इंदिरा नगरातील विक्रांत सहारे यांना शस्त्र विक्री करण्यासाठी येणार असल्याची गुप्त माहिती रामनगर पोलिसांना मिळाली. माहितीचा आधारावर पोलिसांनी सापळा रचला. दोघे घरी पोहताच पोलिसांनी छापा घातला. घरातून चाळीस जिवंत काडतूस, तलवार सापडली. वाहनाची तपासणी केली असता त्यात वाघनख सापडले. पोलिसांनी तिन्ही आरोपीना ताब्यात घेतले आहे. विक्रांत सहारे हे युवासेनेचे (उबाठा) जिल्हाप्रमुख आहेत. सहारे यांच्या अटकेमुळे जिल्ह्यातील राजकारणात खळबळ उडाली आहे. पुढील तपास रामनगर पोलीस करीत आहेत.