रानडुकराच्या हल्यात शेतकरी गंभीर जखमी #chandrapur #Brahmapuri

Bhairav Diwase
सोनेगाव शेतशिवारातील घटना
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) संजय बिंजवे, ब्रम्हपुरी 
ब्रम्हपुरी:- ब्रह्मपुरी वनपरिक्षेत्रांतील उपवन परिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या सोनेगाव येथील शेतात धनाच्या पेंड्या एका शेतातून दुसऱ्या शेतात दुलाई करण्याचे काम करीतअसतांना अचानक झुडपामध्ये दडून बसलेल्या रानटी डुकराने युवा शेतकऱ्यावर हल्ला केल्याने त्या हल्यात धनंजय विठोबा दर्वे नामक शेतकरी गंभीर जखमी झाला आहे. त्याच्या कबरे जवळील भागात व मांडीला मार लागल्याने त्वरित उपचारासाठी त्याला ब्रह्मपुरी येथील जिल्हा उप ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.
ब्रह्मपुरी तालुक्यातील सोनेगाव येथील युवा शेतकरी धनंजय दर्वे. २ ऑगस्टला सकाळच्या सुमारास सोनेगाव शिवारातील शेतात गेला होता. धनंजय कामात मग्न असताना दब्बा धरुन असलेल्या रानटी डुक्कराने त्याच्यावर हल्ला केला. यात युवा शेतकरी गंभीर जखमी झाला आहे. ऐन शेतीच्या हंगामात शेतकरी जखमी झाल्याने त्यांचे कुटुंब उघड्यावर पडले आहे.

सध्या तालुक्यात धान रोवनीचे काम जोमात सुरू आहेत. त्यामुळे तो पण शेतात कामात होता. शिवाय परिसरात सध्या रानटी डुकराचा. मोठ्या प्रमाणावर वावर असून शेत पिकाची प्रचंड नुकसान रानटी डुकराकडून होत आहे.परंतु वन विभागाने रानटी डुकराचा बंदोबस्त करावा. आणि रानटी जनावरांपासून नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना व जखमी व्यक्तीचे कुटुंबांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

घटनेची माहिती वन विभागाला कळताच क्षेत्र सहाय्यक मिलिंद सेमस्कर, वनरक्षक तोंडरे यांनी ग्रामीण रुग्णालयात घटनेतील जखमी रुग्णाची विचारपूस करून सोनेगाव येथील घटनास्थळावर जाऊन घटनेचा पंचनामा केला आहे.