पोंभुर्णा:- पोंभुर्णा तालुक्यातील वैभव पिंपळशेंडे भारतीय जनता युवा मोर्चाचे चंद्रपूर जिल्हा सचिव पदी पदाधिकारी म्हणून कार्यरत असतांना पिंपळशेंडे यांनी सतत भारतीय जनता पार्टीचे विरोधात काम तसेच पक्ष विरोधी कारवाया करत असल्याने भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष महेश देवकते यांनी वैभव पिंपळशेंडे यांची हकालपट्टी केली आहे.
काय म्हटले पत्रात?
आपणास याद्वारे कळविण्यात येते की, आपण भारतीय जनता युवा मोर्चाचे चंद्रपूर जिल्हा सचिव पदी पदाधिकारी म्हणून कार्यरत असतांना, आपण सतत भारतीय जनता पार्टीचे विरोधात काम करीत आहात.
आपण सातत्याने विरोधी पक्षाचे बैठकीत/आंदोलनात सक्रिय सहभाग दर्शवित असल्याने तसेब आपले कृत्य भा.ज.पा. पक्षाने घालून दिलेल्या ध्येय धोरणाचे विरोधात असल्यामूळे, आपणास आज दिनांक 2 ऑगस्ट 2024 पासून भारतीय जनता युवा मोर्चाचे चंद्रपूर जिल्हा सचिव पदावरुन व भारतीय जनता पार्टीतून कायम स्वरुपी "निष्काषीत" करण्यात येत आहे. असे पत्र भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष महेश देवकते यांनी आज दिनांक 2 ऑगस्ट 2024 रोजी काढले.
भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष महेश देवकते यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी सांगितले की वैभव पिंपळशेंडे हे पक्षाच्या विरोधात कार्य करत असल्याने त्याला निलंबित म्हणजेच त्यांना पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.