कॉंग्रेसचे सरपंच शिवाजी वाघमारे भाजपात #chandrapur #Jivati

Bhairav Diwase
जिवती:- तालुक्‍यातील लेंडीगुडा येथील कॉंग्रेसचे सरपंच शिवाजी वाघमारे यांनी दि. १७ ऑगस्ट भाजपात पक्षप्रवेश केला. जिवती तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने आयोजित केलेल्या विस्तारीत कार्यकारणी अधिवेशनात त्यांनी भाजपची वाट धरली. याप्रसंगी विधानसभा निवडणुक प्रमुख देवराव भोंगळे यांनी त्यांच्या गळ्यात भाजपचा दुपट्टा टाकून त्यांचा भाजप परीवारात स्वागत केला.

भाजपाच्‍या लोककल्याणकारी व विकासाभिमुख कार्यशैलीवर विश्‍वास ठेवून श्री. शिवाजी वाघमारे यांनी भाजपात प्रवेश केला, त्यांच्या या विश्‍वासाला आम्‍ही कधीही तडा जावू देणार नाही. यासोबतच त्यांच्या नेतृत्वात लेंडीगुड्याच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही सोबत आहोत अशी ग्‍वाही देवराव भोंगळे यांनी यावेळी बोलताना दिली.

यावेळी जिल्हा महामंत्री विवेक बोढे, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष महेश देवकते, तालुकाध्यक्ष दत्ता राठोड, भाजयुमोचे जिल्हा सचिव संतोष जाधव, तालुका युवा मोर्चाचे अध्यक्ष अंबादास कंचकटले यांचेसह आदिंची उपस्थिती होती.