शिवसेना जिल्हा प्रमुख संदिप गिऱ्हे यांनी दिला मदतीचा हात
पोंभूर्णा:- तालुक्यातील गंगापूर गावात मागील पंधरा दिवसापासून अतिसार व तापाची साथ पसरली आहे.शुद्ध पाण्याचे स्रोत नसल्याने गावकऱ्यांना वैनगंगा नदितील गढुळ व दुषीत पाणी प्यावे लागत आहे.दुषीत पाण्याने गावात साथीच्या रोगाची साथ पसरली असल्याने गावकरी व सामाजिक कार्यकर्त्यांनी गंगापूर गावात जलशुद्धीकरण संयंत्र बसवून देण्याची विनंती केली होती.मात्र प्रशासनाने या मागणीकडे दुर्लक्ष केले.त्यामुळेच गावातील दोघांचा अतिसार व तापाच्या साथीने मृत्यू झाला आहे.पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आरो प्लॅन्टची काही दिवसाअगोदर घोषणा केली होती. पण त्या गावाला अजुनपर्यंत आरो प्लॅन्ट मिळाले नाही. गंगापूर गावात अशुद्ध पाणी पिल्याने दोघांच्या मृत्यूची बातमी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे चे जिल्हाप्रमुख संदिप गिऱ्हे यांना कळताच त्यांनी स्वखर्चाने गंगापूर गावातील लोकांना शुद्ध पिण्याचे पाणी मिळेल यासाठी आरो प्लॅन्ट लावून दिले आहे.
तालुक्यातील गंगापूर गावात मागील पंधरा दिवसापासून अतिसार व तापाची लागण सुरू आहे.आरोग्य विभागाचे व प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे अतिसार व तापाच्या साथीने दि.८ ऑगस्टला गंगापूर येथील शोभा भिकाजी वाघाडे वय (४२), व दि.१६ ऑगस्टला सुरज काशीनाथ मंढरे वय (२१) यांचा मृत्यू झाला.गंगापूर गावात येवढी मोठी साथ चालू असताना आरोग्य विभाग व प्रशासन मात्र याकडे अक्षम्य दुर्लक्ष करीत आहे.जर या गावातील दुषीत पाण्याच्या संबंधित ठोस उपायोजना केले असते तर हि घटना घडली नसती असा आरोप गावकरी करीत आहेत.गंगापूर गावात दुषीत पाणी पिल्याने दोघाचा मृत्यू झाल्याची घटना माहिती होताच सामाजिक जबाबदारी म्हणून शिवसेना जिल्हाप्रमुख संदिप गिऱ्हे यांनी स्वखर्चाने दि.१७ ऑगस्टला आरो प्लॅन्ट लावून दिले.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संदिप गिऱ्हे, तालुका प्रमुख आशिष कावटवार,सामाजिक कार्यकर्ते वैभव पिंपळशेंडे, अंशूल मोरे,गणेश वासलवार,अनिल राऊत,अमित मोरे,गोकुल तोडासे,महेश श्रीगिरीवार,राकेश हस्से,क्षितीज तोडसाम,कामीना गद्देकार यांची उपस्थिती होती.