चंद्रपूरात मनसैनिक भिडले, दोन गटात हाणामारी #Chandrapur #MNS

Bhairav Diwase

चंद्रपूर:- मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी चंद्रपूर आणि राजुरा विधानसभेसाठी उमेदवार घोषित केली आहेत. आत्तापर्यंत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे 6 उमेदवार ठाकरेंकडून घोषित करण्यात आले. चंद्रपूर विधानसभेसाठी मनदीप रोडे आणि राजुरा विधानसभेसाठी सचिन भोयर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दरम्यान, राज ठाकरेंनी उमेदवार घोषित करताच चंद्रपूरमध्ये मनसैनिक भिडले आहेत. दोन गटात हाणामारी झाली आहे. सचिन भोयर यांच्या उमेदवारीला विरोध करत भोयर समर्थक आणि चंद्रप्रकाश बोरकर समर्थकांमध्ये हाणामारी झाली आहे.

राज ठाकरेंकडून चंद्रपूर जिल्ह्याच्या बैठकीत राजुरा विधानसभेसाठी सचिन भोयर नावाच्या पदाधिकाऱ्याला उमेदवारी जाहीर करण्यात आली. मात्र त्यास जिल्हा सचिव चंद्रप्रकाश बोरकर यांचा व त्यांच्या कार्यकर्त्यांचा उमेदवारीला तीव्र विरोध होता. त्या मुद्द्यावरूनच दोन गटांमध्ये आधी शाब्दिक वादावादी झाली आणि नंतर धक्काबुक्की झाली त्यानंतर हे प्रकरण एकमेकांना मारहाण करण्यापर्यंत गेलं.