बंदच्या पार्श्वभूमीवर उद्याचा रोजगार मेळावा पुढे ढकलला #chandrapur

Bhairav Diwase

चंद्रपूर:- मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा लाभ जिल्ह्यातील जास्तीत जास्त सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींना मिळावा, या उद्देशाने जिल्हा प्रशासनाच्या वतीने शुक्रवार दि. 23 ऑगस्ट रोजी नियोजन भवन येथे रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता. मात्र जिल्ह्यात विविध कारणांनी होणा-या बंदच्या पार्श्वभुमीवर मेळाव्यासाठी येणा-या युवक-युवतींना नाहक त्रास होऊ नये, यासाठी 23 ऑगस्ट रोजी होणारा रोजगार मेळावा पुढे ढकलण्यात आला आहे, कृपया याची सर्वांनी नोंद घ्यावी. तसेच रोजगार मेळाव्याची पुढील तारीख लवकरच कळविण्यात येईल, असेही जिल्हा प्रशासनाने म्हटले आहे..