महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ तोंडावर काळ्या फिती बांधून आंदोलन #chandrapur #pombhurna

Bhairav Diwase
पोंभूर्णा:- महाराष्ट्रातील बदलापूर येथील दोन मुलींवर व आरमोरी येथील एका मुलीवर तसेच राज्यातील महिलांवर होणारे वाढते अत्याचार व महिलांच्या सुरक्षेसाठी व असंवेदनशील सरकारच्या निषेधार्थ पोंभूर्णा येथील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले चौकात महाविकास आघाडीच्या वतीने तोंडावर व डोळ्यांवर काळ्या पट्ट्या बांधून दि. २४ ऑगस्ट शनिवारला आंदोलन करण्यात आले.व दोषींना कठोर शिक्षा देण्याची मागणी पोंभूर्णा तहसीलदार मार्फत राष्ट्रपती याना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली.

महिलांवर होणारे वाढते अत्याचार व महिलांच्या सुरक्षेसाठी व असंवेदनशील सरकारच्या निषेधार्थ पोंभूर्णा येथे महाविकास आघाडीच्या वतीने तोंडावर व डोळ्यावर पट्टी बांधून मुक आंदोलन करण्यात आले.दोषींना कठोर शिक्षा देण्याची मागणी यावेळी करण्यात आली.याबाबतचे तहसीलदार मार्फत निवेदन राष्ट्रपती यांना निवेदन देण्यात आले.

आंदोलनात काँग्रेसचे तालुकाध्यक्ष वासुदेव पाल, शिवसेना तालुका प्रमुख आशिष कावटवार, ओमेश्वर पद्मगिरीवार, अशोक गेडाम, सद्गुरू ढोले, धम्मा निमगडे, जयपाल गेडाम, नगरसेवक बालाजी मेश्राम, अभिषेक बद्दलवार, नंदू बुरांडे, वैभव पिंपळशेंडे, दिवू रणदिवे, पराग मुलकलवार, राजू बोलमवार, आनंदराव पातळे, बंडु लिंगलवार, सुनिल कुंदोजवार, महेश श्रीगिरीवार उपस्थिती होते.