मुंबई:- बदलापूर येथील शाळकरी मुलींवरील अत्याचाराच्या घटनेनंतर मविआकडून उद्या (दि.24) महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. मात्र, या बंदपूर्वीच मुंबई उच्च न्यायालयाने मविआला दणका दिला आहे.
कोणत्याही पक्षाला बंद करण्याचा अधिकार नसल्याचे सांगत कोर्टाने बंद केला तर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. वकील गुणरत्न सदावर्तेंसह इतरांनी बंदविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. याबाबत तातडीची सुनावणी पार पडली. त्यावर कोर्टाने बंदला परवानगी नाकारली आहे. तसेच कोणत्याही राजकीय पक्षाला बंद करण्याची परवानगी नसून जर कोणी तसा प्रयत्न करत असेल तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करा असे स्पष्ट निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत. तर काही ठिकाणी कार्यकर्त्यांना पोलीसांकडून नोटीस बजावली जात आहे.