पोंभूर्णा:- शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वतीने शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य शिवसेना, युवासेना, महिला आघाडी कार्यकर्ते व पदाधिकारी मेळावा दि. २७ सप्टेंबरला सुमन मंगल कार्यालय सभागृहात पार पडला. आम्ही लढणार आम्ही जिंकणारच असा बुलंद आवाज देत.तुम्ही तयारी करा यावेळी बल्लारपूर विधानसभेत मशाल पेटलीच पाहिजे असे आवाहनही भास्कर जाधव यांनी यावेळी केले.मुनगंंटीवार यांच्या स्टाइलची नकल करून मुनगंटीवारनी स्वताच्या पक्षासोबत गद्दारी करतो अश्याला बल्लारपूर विधानसभेतून हद्दपार करा अशी तोफ जाधव यांनी डागली.
पुर्व विदर्भाच्या चौदा जाग्यावर आम्हची दावेदारी असणार आहे.तर चंद्रपूर जिल्ह्यातील सहा जागेपैकी आम्ही तीन जागा घेऊ व लढवू असा विश्वास त्यांनी पदाधिकारी यांना मार्गदर्शन करताना व्यक्त झाले.बल्लारपूर विधानसभेसाठी संदिप गिऱ्हे यांना आमदार बनविण्यासाठी कामाला लागा. हि सिट आपलीच आहे. यावेळी मुनगंटीवार यांचाही समाचार घेतला. मुनगंटीवार यांनी स्वतःच्या पक्षासोबत गद्दारी केली. हंसराज अहिर यांच्या खासदारकीची सिट पाडण्याचा प्रयत्न केला होता.अश्या पक्षाशी गद्दारी करणाऱ्याला त्याची जागा दाखवून द्या.त्याला बल्लारपूर विधानसभेत हरवून येथून हद्दपार करा.या विधानसभेत भाजपाला मोठं करण्याचा काम शिवसेनेनेच केले आहे.आता शिवसेनेला या विधानसभेचे नेतृत्व करण्याची वेळ आली आहे.असे यावेळी म्हटले.
यावेळी चंद्रपूर जिल्हा संपर्क प्रमुख प्रशांत कदम, जिल्हाप्रमुख संदिप गिऱ्हे,सिक्की यादव,शालीक फाले, आशिष कावटवार, गणेश वासलवार, बालाजी मेश्राम, महेश श्रीगिरीवार, रवींद्र ठेंगणे,अभिषेक बद्दलवार, रामेश्वरी वासलवार,किरण डाखरे यांंची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आशिष कावटवार, संचालन विशाखा सारणे, आभार प्रदर्शन सुरज माडुरवार यांनी मानले.
शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव यांचे चेक पोंभूर्णा गेटवर स्वागत करण्यात आले.व तिथून चार किमी अंतरावर असलेल्या सभा स्थळापर्यंत तीनशे बाईक व गाड्यांची रॅली काढण्यात आली.पोंभूर्णा येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला व सावित्रीबाई फुले यांच्या फलकाला माल्यार्पण व अभिवादन करण्यात आले.
रॅलीच्या समोर सुरू असलेल्या भुसारी आदिवासी नृत्य आकर्षणाचे केंद्र ठरले.या नृत्यावर आमदार भास्कर जाधव ठेका पकडून मनसोक्त नाचल्याने आमदार जाधव यांच्या नृत्याची पोंभूर्ण्यात चर्चेचा विषय ठरला.शिवसेनाने काढलेल्या रॅलीने पोंभूर्णा शहर अवघे भगवेमय झाले होते.हजारोच्या संख्येने शिवसैनिकाची गर्दी झाली होती."अबकी बार शिवसेनेची मशाल"असा नारा दिला जात होता.यावेळी अनेकांचा पक्षप्रवेशही घेण्यात आला होता.