चंद्रपूर:- तुकूम-दुर्गापूर-ऊर्जानगर-चंद्रपूर, छायाचित्रकार संघटना, चंद्रपूर, द्वारा आयोजित केलेल्या जागतिक छायाचित्रकार दिना निमित्याने फोटोग्राफर परिवारासाठी सुधीर मुनगंटीवार पालकमंत्री, चंद्रपूर यांचा माध्यमातून फिरते नेत्र तपासणी शिबीर राबविण्यात आली होती. "बघायची असेल सृष्टी तर निरोगी असावी तुमची दृष्टी" ही संकल्पना राबविणारे आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार आहेत.
या नेत्र तपासणी शिबिराचा फोटोग्राफर परिवारातील जवळ पास 100 लोकांनी लाभ घेतला असून नेत्र तपासणीत ज्या व्यक्तींचा डोळ्याला लागलेल्या नंबर नुसार, त्याच नंबर चे चष्मे सर्वांना तयार करून देण्यात आले. तर या नेत्र तपासणीत तयार करण्यात आलेल्या चष्म्यांचे वितरण दिनांक 26.09.2024 ला, डॉ. महेंद्र तायडे सर व डॉ. विदिशा तायडे मॅम, देवा बुरडकर यांचा हस्ते त्यांचाच हॉस्पिटल गुणवंत आयुर्वेदा नॅचरोपॅथी सेंटर, तुकूम, येथे वितरण करण्यात आले. तसेच या चष्म्या सोबतच सुधीर मुनगंटीवार यांचा तर्फे प्रत्येकांना एक सुंदर घडी भेट म्हणून देण्यात आली. या सूंदर उपक्रमासाठी प्रत्येक चष्मा लाभार्थ्यांनी सुधीर मुनगंटीवार यांचे मनःपूर्वक अभिनंदन व आभार व्यक्त केले.
तसेच हा उपक्रम, तुकूम - दुर्गापूर - ऊर्जानगर - चंद्रपूर , छायाचित्रकार संघटना, चंद्रपूर, पर्यंत आणण्यासाठी मोलाचा वाटा श्री. देवा बुरडकर यांनी केले आहे. यासाठी त्यांचे पण संघटने तर्फे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले. या संस्थेचा कार्यक्रमात उपस्थित योगेश शिरसागर, प्रीतम खोब्रागडे, गणेश साळवे, रमेश तांडी, अरविंद ब्राह्मणे, जनार्धन मानकर, देविदास भागडे, विजय ढाले, मकसूद शेख, चरण वैरागडे, राजेश कारलेकर, गणेश पाटणकर, जगदीश मानकर, रजनी ठाकरे इत्यादी उपस्तिथ होते