चंद्रपूर जिल्ह्यात पिस्तुल, तलवारीसह एकाला अटक #Chandrapur #korpana

Bhairav Diwase
0
कोरपना:- सणासुदीच्या दिवसांमध्ये गुन्हा घडविण्याच्या उद्देशाने घरी ठेवलेल्या पिस्तुल, तलवार व कोयत्यासह एकाला अटक करण्यात आली. अभिषेक शत्रुघ्न सिंग (वय २२, रा. लोडर कॉलनी, गडचांदूर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. ही कारवाई गडचांदूर पोलिसांनी केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गडचांदूर पोलिस ठाण्यात पोलीस निरीक्षक शिवाजी कदम हजर असताना बंगाली कॅम्प गडचांदुर येथे एक इसम आपल्या घरी अवैद्यरित्या हत्यार बाळगून असल्याची गोपनीय माहिती मिळाली. बंगाली कॅम्प (लोडर कॉलोनी) गडचांदुर येथे सदर इसमाच्या घरी पोलिस गेले. दरवाजा ठोठावून त्याला बाहेर बोलविले असताना त्याला विचारपूरस केली. पंचासमक्ष त्याच्या घराची झडती घेतली असता, घरातील स्टोअर रूममध्ये सज्जावर एक लोखंडी तलवार, एक लोखंडी कोयता व लोखंडी कपाटात एक पिस्तुल आढळून आली.

४१ हजार ५०० रूपयांचा मुदेमाल पोलिसांनी जप्त केला. आरोपीने सदर साहित्या बाळगण्याबाबत कोणतीही परवानगी न घेतल्याचे सांगितले. अवैधरित्या शस्त्र बाळगत असल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)