नंदू खोब्रागडे प्रकरणात पोलिसांची भूमिका संशयास्पद
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) विरेंद्र का. मेश्राम, सिंदेवाही
सिंदेवाही:- तालुक्यातील विरव्हा येथील कोतवाल नंदू खोब्रागडे यांना अनोळखी व्यक्तींनी मला रेती पाहिजे या बहाण्यावरून घरून बोलावून नेले. तेव्हा नामदेव धनविजय यांची दुचाकी वापरण्यात आली असल्याचे पोलीस प्रशासनांनी सांगितलं. त्यावेळी त्यांची मुलगी घरी उपस्थित होती. त्यानंतर घरच्यांनी काही कालावधीनंतर नंदू खोब्रागडे हे घरी न आल्यामुळे त्यांना फोन केले असता त्यांचा फोन लागला नाही. १२ सप्टेंबर २०२४ ला त्यांचा लहान भाऊ संजय खोब्रागडे यांनी पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली. मात्र नंदू खोब्रागडे यांचा शोध न लागल्याने त्यांच्या घरच्यांनी दिनांक २० सप्टेंबर २०२४ ला पत्रकार परिषदेचं आयोजन केले.
तेव्हा नंदू खोब्रागडे यांच्या परिवारातील सदस्यांनी सिंदेवाही पोलीस योग्य तपास करत नाही आहेत. आठ दिवस होऊनही माझा भाऊ मला मिळाला नाही. तसेच पोलीस अधिकारी यांना विचारणा केली असता त्यांचे कडून आमचे समाधान होत नाही आहे. असा आरोप पत्रकार परिषदेत केला. त्यानीं नंदू खोब्रागडे यांचा शोध लावून आम्हांला मिळवून द्यावा.आठ दिवसांपासून लेकरं शाळेत जात नाहीत.व जेवण सुद्धा करत नाही आहेत.आमच्या कुटुंबियांची व्यथा आम्हांलाच माहित आहे.असे नंदू खोब्रागडे च्या पत्नी यावेळी सांगितलं.तसेच सिंदेवाही पोलीस प्रशासन आठ दिवस होऊनही योग्य तपास करत नाहीत.ही सिंदेवाही आहे त्यांना माहिती नाही.आज पन्नास लोक पोलीस स्टेशनला विचारणा करायला गेलो.ही फक्त प्राथमिक भूमिका होती.गरज भासल्यास पोलिसांना सुद्धा सळो की पळो करून सोडू असे मत जिल्हा शांतता समितीचे सदस्य नंदू खोब्रागडे यांनी व्यक्त केले.त्यानंतर पत्रकार पोलीस प्रशासनाला विचारणा करण्याकरिता स्टेशनला गेले असता त्यांनी पोलीस निरीक्षक विजय राठोड यांनी सांगितले कि, घटनेतील दोन वाहने जप्त केले असून त्यामध्ये एक दुचाकी व एक चारचाकी आहे.त्यापैकी दुचाकी नामदेव धनविजय राहणार सिंदेवाही जि.चंद्रपूर यांची आहे तर चारचाकी सोपान जिल्हारे राहणार समुद्रपूर जि.वर्धा यांची आहे.दोघांनाही पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास सुरु आहे.
पत्रकारांनी पोलीस स्टेशनला भेट दिली. त्यावेळी पोलीस कोठडीत दोन्ही आरोपी नव्हते. याबाबत विचारणा केली असता कुणी सांगत होते कि तपासासाठी त्यांना बाहेर नेले आहे. तर कुणी सांगत होते पोलीस कोठडीत आहेत.तसेच पत्रकारांना ते वेगळ्याच अवस्थेत निदर्शनास आले.त्यामुळे पोलीस प्रशासन पोलीस कोठडीचे सिसिटीव्ही फुटेज अटक केल्या दिवसापासूनचे पत्रकारांना जाहीर करतील काय ? असा ज्वलंत प्रश्न निर्माण होत आहे.