Joining BJP: विधानसभेच्या तोंडावर युवकांनी सोडली काँग्रेसची साथ; भाजपात प्रवेश

Bhairav Diwase
पोंभुर्णा:-
महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या कार्यावर विश्वास ठेवून विधानसभेच्या अगदी तोंडावर काँग्रेसची साथ तरुणांनी सोडली आहे. पोंभुर्णा तालुक्यातील मौजा पिंपरी देशपांडे येथील युवकांनी काल दिनांक 21/09/2024 रोजी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश घेतला.


आशिष पाल,पराग अर्जुनकर, जगदीश पाल,अंकित देशमुख, ताराचंद व्याहाडकर, राकेश व्याहाडकर , प्रमोद भोयर, अविनाश गोहणे, श्रीकृष्ण जवादे, प्रशांत खरबनकर, राहुल चिमूरकर, पवन आरेकर, एकनाथ पाल, रुपेश सोनटक्के, पंकज व्याहडकर, अक्षय बोरकुटे, नितेश बावणे, अजय वासेकर, प्रशांत धुडसे यांनी भाजपामध्ये प्रवेश केला.पक्षप्रवेश घेतल्यानंतर ना.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी सर्व कार्यकर्त्यांचे स्वागत करत अभिनंदन केले. पिपरी देशपांडे गावाच्या विकास कामामध्ये कुठलीही कमतरता भासणार नाही अशी ग्वाही ना.मुनगंटीवार यांनी दिली.

यावेळी पक्षप्रवेश करतांना पोंभुर्णा पंचायत समितीचे माजी उपसभापती श्री विनोदभाऊ देशमुख ,भाजपा तालुका महामंत्री ओमदेव भाऊ पाल ,भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष अजय मस्के, भाजपा नेते रंजित पिंपळशेंडे , तालुका महामंत्री आदित्य तुम्मुलवार, सोशल मीडिया सहसंयोजक शिवम ओदेलवार,भाजपा कार्यकर्ता साहिल वनकर आदी उपस्थित होते.