चंद्रपूर:- पोलिस भरती करणारे विद्यार्थी मागील पोलिस शिपाई भरती 2022-2023 भरतीमध्ये तांत्रिक अडचणी कारणास्तव संधी देण्यात आली नाही. मध्यंतरी आझाद मैदान, मुंबई येथे उपोषणासाठी विद्यार्थी बसले असता त्यावेळी महाराष्ट्र पोलिस महानिरीक्षक पडवळ साहेब यांनी एक संधी बाबत पत्र काढले असता त्यात फक्त 2023 मध्ये वय ओलांडणाऱ्या विद्यार्थ्यांना संधी देऊ असा उल्लेख केला आहे.
पोलिस शिपाई भरती 2022-23 ची असल्यामुळे 2 वर्ष सवलत देण्यात यावी. तरीही आपण दुरुस्ती करुन 2022, 2023 असा उल्लेख करुन शासन स्तरावर प्रस्ताव पाठवावा असे निवेदन ना. सुधीर मुनगंटीवार यांच्यामार्फत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविण्यात आले आहे. तसेच आगामी पोलिस भरतीची जाहिरात लवकरात लवकर काढण्यात यावी अशी मागणी पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांनी ना. सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे केली.