भद्रावती:- भद्रावती तालुक्यातील चंदनखेडा या आदर्श गावातील तंटामुक्त समितीकडे तंटे करणारे कमी आणि प्रेम विवाह लावून मागणाऱ्या प्रेमी युगुलांची संख्या वाढत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
नुकताच या तंटामुक्त समितीने चिमूर तालुक्यातील सावरी येथील युवक वैभव राजू श्रीरामे (२१) व याच तालुक्यातील बोथली येथील युवती प्रीती विठ्ठल बारेकर (२०) यांनी चंदनखेडा येथील महात्मा गांधी तंटामुक्त समितीकडे विवाह लावून देण्याची मागणी केली. त्यानुसार तंटामुक्त समितीने एक बैठक घेऊन व दोन्ही कुटुंबांना माहिती देऊन आणि सर्व कायदेशीर बाबी तपासून चंदनखेडा येथील विठ्ठल मंदिरात या प्रेमीयुगुलांचा विवाह लावून दिला.
विशेष म्हणजे चंदनखेडा तंटामुक्त समितीने प्रेमी युगुलांचा लावून दिलेला हा नऊ महिन्यांतील अकरावा प्रेम विवाह आहे. त्यामुळे संपूर्ण भद्रावती तालुक्यात चंदनखेडा येथील महात्मा गांधी तंटामुक्त समिती ही प्रेमी युगुलांचे विवाह लावून देण्यात अव्वल ठरली आहे.
वैभव आणि प्रीती यांच्या विवाहप्रसंगी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष मनोहर हनवते, पोलिस पाटील समिर पठाण, सरपंच नयन जांभुळे, माजी उपसरपंच तथा समाजपरिवर्तक विठ्ठल हनवते, पाचगाव चे पोलिस पाटील विकास दुरनकर, खोकरीचे पोलिस पाटील सतीश कुरेकर, सिंगलदीप पेंदाम, रविंद्र मेश्राम, शाहरुख पठाण, विठ्ठल महागमकार, अशोक रणदिवे, नंदकिशोर जांभुळे, सुधाकर दोडके, संदिप चौधरी, सतिश कुरेकार, सतिश उरकांडे, निसारखाॅं पठाण, अतुल घरत, गणेश जीवतोडे, संबा दडमल, बशीर शेख, तंटामुक्त समिती सदस्या छाया घुगरे, सुशिलाबाई हनवते, अमृता कोकुडे, सोनाबाई खडसंग, गंगु शेरकुरे, नसरिन पठाण, छाया मांदाळे, वैशाली दडमल, सुनंदा नन्नावरे, बेबी गुरुनुले, आशा दुटनकर, गुलाब नन्नावरे, सिमा दुटनकर, स्वप्निल गायकवाड, दिलिप कुळसंगे, विजय दुटनकर, कमल बाटबरवे, कवडु जांभुळे, बालाजी धोंगडे, उद्धव नन्नावरे, रमाकांत बोढे, आशा नन्नावरे, शारदा गोहणे, आनंद राजनहिरे, ईश्वर लाखे, गोरख कोकुडे, कवडु पाठक, शरद कोकुडे, अक्षय शेन्डे, विठ्ठल चौधरी, भाग्यश्री सोनुले, सुषमा सोनुले, पुरषोत्तम पाठक, अरविंद पाटिल, महेंद्र गुरुनुले, प्रफुल्ल ठावरी, देवानंद पांढरे, वृषभ दडमल, देवानंद दोडके, अमोल महागकार, प्रमोद हनवते, स्वप्निल चौखे, शंकर दडमल, अनिल हनवते, आनंदराव दडमल, रमेश चौखे, पवन भोस्कर, दिलिप ठावरी, आशिष हनवते व गावातील नागरिक उपस्थित होते.