यादवराव धोटे महाविद्यालयात गणेश उत्सव उत्साहात साजरा #Chandrapur#Rajura

Bhairav Diwase
राजुरा:- राजुरा येथे अँड.यादवराव धोटे मेमोरियल सोसायटी द्वारा संचालित अँड.यादवराव धोटे महाविद्यालयात दरवर्षीप्रमाणे गणेश उत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला,यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष राजुरा विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार अँड. संजय धोटे यांच्या हस्ते मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सचिव डॉ.अर्पित धोटे व प्राचार्य सौ.वर्षा पोडे, प्राचार्य सौ.मीनाक्षी कालेश्वरवार उपस्थीत होत्या.

यादवराव धोटे महाविद्यालयात संस्थेचे सचिव डॉ.अर्पित धोटे यांच्या मार्गदर्शनात गेल्या अनेक वर्षांपासून सांस्कृतिक परंपरा जोपासत गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येत आहे.यावेळी महाविद्यालयात ९ सप्टेंबरला विज्ञान विभागातर्फे शिक्षक दिनानिमित्त महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांमार्फत स्वयंशासनराबवण्यात आले तसेच १० सप्टेंबरला महाविद्यालयात अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनावर आधारित निबंध स्पर्धा, एकांकिका व पोस्टर स्पर्धा घेण्यात आली तसेच १२ सप्टेंबरला विविध सांस्कृतिक कार्यक्रम महाविद्यालयात घेण्यात आले.तसेच महाविद्यालय विद्यार्थी प्रतिनिधी निवडणूक घेण्यात आली.यामधे मुख्यमंत्री म्हणून बालाजी मंडल यांची निवड करण्यात आली. उपमुख्यमंत्री म्हणून आर्यन मोरे,क्रीडा मंत्री म्हणून ओम ढोबे,सांस्कृतिक मंत्री म्हणून रुद्राक्ष निखाडे,आरोग्य तथा स्वच्छता मंत्री म्हणून आचल वडस्कर महिला सुरक्षा मंत्री म्हणून स्वीटी आत्राम यांची निवड करण्यात आली,यावेळी निवडणूक अधिकारी म्हणून प्राध्यापक गोविंद झाडे यांनी काम बघितले.

तसेच यादवराव धोटे स्मृती महाविद्यायाची (बॅचलर ऑफ फॅशन डिझायनिंग) निवडणूक पार पडली यामधे मुख्यमंत्री म्हणून वैष्णवी चांदुरकर, उपमुख्यमंत्री म्हणून कांचन झाडे, क्रीडा मंत्री म्हणून सुरज गेडाम, सांस्कृतिक मंत्री म्हणून मुस्कान सिंग, आरोग्य तथा स्वच्छता मंत्री सना खान,महिला सुरक्षा मंत्री म्हणून कल्याणी तेलतुंबडे यांची निवड झाली.
यावेळी क्षेत्र प्रमुख म्हणून प्रा.मीनाक्षी कालेश्वरवार व प्रा.वर्षा पोडे यांनी काम बघितले.

यावेळी पर्यवेक्षक इर्शाद शेख, प्राध्यापक अल्पना दुधे, सुप्रिया गोंड,रेणुका देशकर,गोविंद झाडे,मंगेश कुडमेथे,गौरी पायतोड,रोहित रांजिकर,मनीषा राखुंडे,नजीर सैय्यद, धनंजय डवरे,आशिष ताजने,प्रणिता पानसे,आसावरी धोटे,अविनाश रट्टे,आकाश भिसेकर,प्रशांत धनवलकर,गुणवंता कार्लेकर, योगिता साळवे उपस्थित होते.