चंद्रपूर:- विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या ब्रम्हपुरी विधानसभा मतदारसंघात आयोजित कुणबी समाज महाअधिवेशनात खासदार प्रतिभा धानोरकर यांनी ब्रम्हपुरी किंवा गडचिरोलीतील अल्पसंख्याक लोकांनाच अनेक वर्षांपासून प्रतिनिधित्व दिले जाते.
ही परंपरा बदलण्याची गरज असल्याचे ते म्हणाले अशा वक्तव्यावर अल्पसंख्यांक समाजाने तीव्र आक्षेप व्यक्त करत विविध समाजाच्या सामाजिक कार्यकर्त्यांनी आयोजित पत्रकार परिषदेत अल्पसंख्याक समाजाची जाहीर माफी मागावी अशी मागणी केली.
लोकसभा निवडणुकीत विविध समाजातील सामाजिक कार्यकर्ता आणि अल्पसंख्याक समाजा मतांवर खासदार प्रतिभा धानोरकर निवडून आल्या आहेत. या समाजाला प्रतिनिधित्वाचा अधिकार नाही का? असा प्रश्न यावेळी करण्यात आला. त्यांच्या या वक्तव्यातून खासदारांची मानसिकता उघड होते. त्यांची विचारधारा जैन, शीख, बौद्ध, मुस्लिम आणि इतर समाजाच्या प्रतिनिधीत्वाच्या विरोधात नसेल तर खासदारांनी जाहीरपणे आपले शब्द मागे घ्यावेत आणि संपूर्ण अल्पसंख्याक समाजाची माफी मागावी अशी मागणी पत्रकार परिषदेत करण्यात आली. पत्रपरिषदेत सामाजिक कार्यकर्ते सुरेंद्र रायपुरे, जाकीर शेख, भिक्खू सुचित बोधी, अमान अहमद, शाहबाज पठाण, हिमायू अली इ. उपस्थित होते.