आम आदमी पार्टीच्या मागणीला यश; शेणगाव ग्रामिण रुग्णालयाला नविन रुग्णवाहीका.

Bhairav Diwase
आम आदमी पार्टीच्या मागणीला यश; शेणगाव ग्रामिण रुग्णालयाला नविन रुग्णवाहीका.


जिवती:- ग्रामीण रुग्णालय शेणगाव येथिल रुग्णालय गेल्या दोन वर्षापासुन रुग्णाच्या सेवेत आला आहे मात्र रुग्णवाहीका जुनीच देण्यात आली होती. जिवती तालुका ग्रामीण भाग असल्याने व रस्त्याच्या दुर्दशेमुळे गाडी चालवने खुप कठिण होते. रात्रो बेरात्रो रुग्णाच्या सेवेत ठेवण्यात आलेली गाडी कधी कुठे बंद पडेल यांची खात्रीच नव्हती. अश्या अवस्थेत सुद्धा रुग्णवाहीका चालक रामेश्वर शेळके सोबत नामदेव जाधव यांनी अस्या गाडीने रुग्णाला सेवा देत होते.

 यावेळी आपचे राजुरा विधानसभा प्रमुख मा.सुरज भाऊ ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आम आदमी पार्टीचे जिवती तालुका अध्यक्ष सुनिल भाऊ राठोड गोविंद गोरे गोपाल मोहिते नितेश करे अविनाश जाधव यांनी आरोग्य मंत्री साहेब व जिल्हा आरोग्य अधिकारी साहेब चंद्रपुर यांना वारवांर निवेदन अर्ज देऊन पाठपुरावा केल्याने आज त्यांच्या पाठपुराव्याला यश मिळाला व ग्रामीण रुग्णालय शेणगाव येथे रुग्णाच्या सेवेत नविन रुग्णवाहीका आली आहे व ग्रामीण रुग्णालय शेणगाव च्या कर्मचारी कडुन सुनिल भाऊ राठोड व सर्व टिमचे आभार मानले आहे.