Candidate announced: वंचितकडून बल्लारपूर व चिमूर विधानसभेचे उमेदवार जाहीर...

Bhairav Diwase
मुंबई:- प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीने उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली आहे. याआधी वंचितने जाहीर केलेल्या दुसऱ्या यादीत १० मुस्लिम उमेदवारांना संधी दिली होती. विशेष म्हणजे या यादीत प्रकाश आंबेडकरांनी वरळी मतदारसंघात आदित्य ठाकरे यांच्याविरोधातही उमेदवाराची घोषणा केली आहे.

लोकसभा निवडणुकीपासूनच विधानसभा निवडणुकीची तयारी करणाऱ्या वंचितने विधानसभा निवडणूक जाहीर होण्याआधीच वंचितकडून उमेदवारांच्या दोन याद्या जाहीर करण्यात आल्या आहेत. पहिल्या यादीत ११ उमेदवारांची नावे होती. तर दुसऱ्या यादीत १० उमेदवारांची नावे होती. आता तिसऱ्या यादीत ३० उमेदवारांना संधी देण्यात आली आहेत. त्यामुळे वंचितकडून आतापर्यंत ५१ उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. विशेष म्हणजे वंचितने आपल्या यादीत उमेदवारांच्या नावासह त्यांच्या जातीचा देखील उल्लेख केला आहे.

वंचितने जाहीर केलेल्या तिसऱ्या यादीतील उमेदवारांची नावे -

बल्लारपूर मतदारसंघ - सतीश मुरलीधर मालेकर (कुणबी)

चिमुर विधानसभा मतदारसंघ - अरविंद आत्माराम सदिकर (माना)

धुळे शहर मतदारसंघ - जितेंद्र शिरसाट (बौद्ध)
सिंदखेडा मतदारसंघ - भोजासिंग तोडरसिंग रावल (राजपूत)
उमरेड मतदारसंघ - सपना राजेंद्र मेश्राम (बौद्ध).
किनवट मतदारसंघ - प्रा. विजय खुपसे (आंध-आदिवासी)
नांदेड उत्तर -गौतम दुथडे
देगलूर विधानसभा मतदारसंघ -सुशील कुमार देगलूरकर(बौद्ध)
पाथरी मतदारसंघ - विठ्ठल तळेकर (माळी)
परतूर - आष्टी मतदारसंघ - रामप्रसाद थोरात (माळी)
घनसावंगी - कावेरीताई बळीराम खटके.
जालना मतदारसंघ - डेव्हिड धुमारे,
बदनापुर - सतीश खरात.
देवळाली - अविनाश शिंदे,
इगतपुरी - भाऊराव काशिनाथ डगळे,
उल्हासनगर - डॉ. संजय गुप्ता.
अणुशक्ती नगर - सतीश राजगुरू
वरळी मतदारसंघ - अमोल आनंद निकाळजे
पेण मतदारसंघ - देवेंद्र कोळी
आंबेगाव मतदारसंघ - दिपक पंचमुख
संगमनेर - अझीज अब्दुल व्होरा
राहुरी - अनिल भिकाजी जाधव
माजलगाव मतदारसंघ - शेख मंजूर चांद
लातुर शहर मतदारसंघ - विनोद खटके
तुळजापूर मतदारसंघ - डॉ. स्नेहा सोनकाटे,
उस्मानाबाद - प्रणित शामराव डिकले
परंडा मतदारसंघात - प्रविण रणबागुल
अक्कलकोट - संतोषकुमार खंडू इंगळे
माळशिरसमधून - राज यशवंत कुमार
आणि मिरज मतदारसंघात विज्ञान प्रकाश माने यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.