Chandrapur news: पेट्रोलींग दरम्यान पंचाहत्तर लाख रुपयांची रोकड जप्त

Bhairav Diwase

चंद्रपूर:- चंद्रपूर पोलीसांनी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पेट्रोलींग दरम्यान पंचाहत्तर लाख रुपयांची रोकड जप्त केली आहे.

विधानसभेच्या अनुषंगाने संशयीतरित्या रोख रक्कमेची वाहतुक करणाऱ्यांना पकडुन कारवाई करण्यासाठी जिल्हयात ठिकठिकाणी एस.एस.टी. पॉईन्ट नाकाबंदी तसेच एफ.एस.टी. पेट्रोलींगसाठी वेगवेगळे पथक नेमण्यात आले आहेत. त्या मार्फतीने अवैध रोख रक्कम वाहतुकीवर लक्ष ठेवुन असतांना मंगळवारी मिळालेल्या गुप्त माहितीवरुन वरोरा पोलीस स्टेशन हद्दीत एका संशयीत चारचाकी वाहनांची पोलीस पथक आणि एफ.एस.टी.पथकाने संयुक्तरित्या तपासणी केली.

त्यावेळी सदर वाहनात मोठया प्रमाणात रोख रक्कम असल्याचे दिसून आल्याने सदर वाहनास वरोरा पोलीस स्टेशन येथे आणुन वाहनातील रोख रक्कमेबाबत एफ.एस.टी.पथक व वरोरा पोलीसांनी वाहन धारकाकडे विचारपुस केली. तेव्हा वाहनधारकाने पंचाहत्तर लाख रुपयांची रोख रक्कम वाहतुकी बाबतचे कारण समाधानकारक उत्तर न दिल्याने सदर वाहनातील रोख रक्कमेचा पंचनामा करुन सदरची रोख रक्कम जप्त करण्यात आली. प्रकरण पुढील चौकशी करीता आयकर विभागाचे स्वाधीन करण्यात आले आहे.