Brijbhushan pazare: मित्राला घट्ट मिठी, ब्रिजभूषण पाझारेंना अश्रु अनावर!

Bhairav Diwase
चंद्रपूर:- चंद्रपूर विधानसभा क्षेत्रातील महायुतीच्या उमेदवारीचा तिढा अखेर सुटला असून भाजपाकडून किशोर जोरगेवार यांना अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली. मात्र ब्रिजभुषण पाझारे हे चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यास इच्छुक होते. मात्र ऐनवेळी त्यांना डावलून आ. किशोर जोरगेवार यांना पक्षाने उमेदवारी दिली. नाराज झालेले ब्रिजभुषण पाझारेंनी आज आपला अपक्ष उमेदवार म्हणून नामांकन अर्ज दाखल केला. ना. सुधीर मुनगंटीवार यांचे कट्टर समर्थक मानले जाणारे ब्रिजभुषण पाझारे यांनी भाजपा जिल्हा महामंत्री व प्राथमिक सदस्यत्व पदाचा राजीनामा दिल्याने चंद्रपूर जिल्ह्यातील राजकीय क्षेत्रात खळबळ माजली आहे.


नेमकं काय घडलं?

ब्रिजभूषण पाझारे हे उमेदवारी अर्ज भरायला जात असताना जुना मित्र समोर दिसताच पाझारे यांचा संयम सुटला आणि मित्राच्या पायावर लोटांगण घातले. कार्यकर्त्यांनी त्यांना उचलले. पण तोपर्यंत त्यांचे डोळे भरून आले. ते मित्राच्या खांद्यावर डोकं ठेवून ढसाढसा रडले. आता हा व्हिडिओ (VIDEO) चांगलाच व्हायरल होत आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओत ब्रिजभूषण पाझारे हे अनेक कार्यकर्त्यांसोबत चालताना दिसत आहे. मात्र काही वेळात ब्रिजभूषण पाझारे यांना रस्त्यावरुन जात असताना त्यांचा जुना मित्र भेटतो त्यात पुढे व्हिडिओत दिसेल की त्यांच्या मित्र त्यांना दिसताच ब्रिजभूषण पाझारे हे मित्राच्या पायावर डोकं ठेवून ढसाढसा रडताना दिसून येत आहे. व्हिडिओत नंतर दिसेल की त्यांच्या मित्र त्यांना उठवतो मग ते त्यांच्या खांद्यावर डोकं ठेवून पुन्हा रडण्यास सुरुवात करतात. संपूर्ण व्हिडिओ तेथील एका कार्यकर्त्यांने मोबाईलवर कैद केलेला आहे. ब्रिजभूषण पाझारे यांचा व्हिडिओ युट्युब या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.