Gadchiroli News: गडचिरोलीत पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक; पाच नक्षलवादी ठार

Bhairav Diwase

गडचिरोली:- आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकी च्या अनुषंगाने जिल्ह्यामध्ये विध्वंसक कारवाया करून घातपात घडविण्याच्या उद्देशाने मागील दोन दिवसापासून काही माओवादी एकत्र येऊन कट रचनेच्या तयारीत असून ते गडचिरोली महाराष्ट्र व नारायणपूर छत्तीसगड सीमेलगत असलेल्या कोपर्शी तालुका भामरागड जंगल परिसरात दबा धरून बसण्याची गोपनीय सूत्रांकडून विश्वसनीय माहिती मिळाल्याने मा . वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक अभियान श्री यतिश देशमुख व अप्पर पोलीस अधीक्षक प्रशासन श्री एम. रमेश यांचे नेतृत्वात सी 60 पथकाच्या 22 तुकड्या व सीआरपीएफ च्या QAT च्या 02 तुकड्या या कोपर्शी जंगल परिसरात दोन वेगवेगळ्या ठिकाणी माओवाद विरोधी अभियान राबविण्या करिता रवाना करण्यात आल्या.



सदर जंगल परिसरात पोहोचताच माओवाद्यांनी पोलीस पथकाच्या दिशेने अंदाधुंद गोळीबार करण्यास सुरुवात केली. यावेळी पोलीस पथकाकडून माओवाद्यांना शस्त्र खाली टाकून शरण येण्याचे आवाहन करण्यात आले परंतु माओवाद्यांनी शरण न येता पोलीस पथकावर अंदाधुंद गोळीबार सुरू ठेवला. सदर गोळीबाराला प्रत्युत्तर देताना पोलीस पथकाकडून दोन्ही वेगवेगळ्या ठिकाणी गोळीबार करावा लागला या अभियानात 05 माओवाद्यांना कंठस्नान घालण्यात गडचिरोली पोलीस दलास यश प्राप्त झाले झाले. सदर जंगल परिसरात शोधमोहीम सुरू आहे असून मृत माओवाद्यांची त्यांची ओळख पटवण्याची प्रक्रिया सुरू आहे. याबाबतची अधिक सविस्तर माहिती उद्या आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात येईल