वरोरा:- 75- वरोरा विधानसभा मतदार संघ भारतीय जनता पक्षाच्या वाट्याला जागा मिळावी म्हणून अनेक कार्यकर्त्यांनी व नेत्यांनी अथक परिश्रम घेतले व त्याला यश सुद्धा प्राप्त झाले. माजी मंत्री स्व. संजयबाबू देवतळे यांचे सुपुत्र करण देवतळे यांना महायुतीने अधिकृत उमेदवारी जाहीर केली. संजय देवतळे साहेबांच्या निधन झाल्यानंतर करण देवतळे हे मागील काही वर्षापासून भाजपच्या विविध संघटनेत काम करीत होते. साहेबांचे राहिलेले अपूर्ण कार्य पूर्ण करण्याचे स्वप्न उराशी बाळगून होतो, ती संधी पूर्ण करण्यासाठी करण देवतळे यांना महायुती कडून उमेदवारी दिली आहे. त्यामुळे सर्व तरुणांमध्ये एकप्रकारे उत्साह वातावरण निर्माण झाले आहे.
महायुतीचे उमेदवार करण देवतळे हे आज दि. 29 ऑक्टोबरला आपला नामनिर्देशन अर्ज दाखल करणार असून उद्या सकाळी १० वाजता कटारिया मंगल कार्यालय ते तहसील कार्यालय पर्यंत शक्तिप्रदर्शन करीत दुपारी १२ वाजता नामांकन अर्ज दाखल करणार आहे. तरी आपण सर्वांनी मला आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित राहावे असे आवाहन महायुतीचे उमेदवार करण देवतळे यांनी केले.