Sandip Girhe: संदीप गिऱ्हे अपक्ष निवडणूक लढणार!

Bhairav Diwase


बल्लारपूर:- बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील महाविकास आघाडीच्या उमेदवारीचा तिढा अखेर सुटला असून कॉंगेसकडून संतोष रावत यांना अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली. मात्र शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संदीप गिऱ्हे हे अपक्ष लढणार असून दि. 29 ऑक्टोबर रोजी ते आपला नामांकन अर्ज दाखल करतील. संदिप गिऱ्हे यांनी व्हाट्सअपच्या माध्यमातून बल्लारपूर विधानसभा लढणार आणि जिंकणार असा मेसेज टाकण्यात आला. कार्यकत्यांना तयारी करण्याच्या सुचना दिल्या.


संदीप गिऱ्हे यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले कि  कार्यकर्त्यांच्या विनंतीनुसार मी 29 ऑक्टोबरला नामांकन अर्ज दाखल करणार आहो.