गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघातील सहापैकी एक म्हणजे विधानसभा मतदारसंघ अहेरी! आतापर्यंत गडचिरोली जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे धर्मरावबाबा आत्राम असे समीकरण होते. आत्राम कुटुंबातील घरफुटीमुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणं देखील बदलली आहेत. धर्मरावबाबा आत्राम हे राष्ट्रवादीच्या अजित पवार गटा आहे . तर, त्यांची मुलगी भाग्यश्री आत्राम-हलगेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश केला. अखेर शरद पवारांच्या राष्ट्रवादीची उमेदवारी जाहीर झाली असून बाप विरुद्ध लेक अशी लढत होणार आहे.
Aheri Assembly Elections: अहेरी विधानसभेत बाप विरुद्ध लेक अशी लढत होणार
रविवार, ऑक्टोबर २७, २०२४