बल्लारपूर:- महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 20 नोव्हेंबर रोजी होणार आहे या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची आज 29 ऑक्टोबर हि शेवटची तारीख आहे. काल 28 ऑक्टोबरपर्यंत चंद्रपूर जिल्ह्यातील सहा विधानसभेमध्ये उमेदवारांनी आपले अर्ज सादर केले आहेत. प्रमुख राजकीय पक्षाच्या उमेदवारांनी आपापले अर्ज सादर केले असून मोठे शक्ती प्रदर्शन करीत सादर केलेल्या या उमेदवारी अर्ज मध्ये बल्लारपूर मुल विधानसभा क्षेत्राचे सुधीर मुनगंटीवार यांनी सादर केलेल्या उमेदवारी अर्ज दर्दी आणि गर्दींची अफाट उपस्थिती सर्वत्र चर्चिल्या जात आहे. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत "पसंती चुकली...!" याची जाणीव मतदारांना झाल्याची प्रचिती मुनगंटीवारांच्या गर्दी आणि दर्दी मध्ये दिसली.
चंद्रपूर लोकसभा निवडणुकीत सुधीर मुनगंटीवार यांच्या पराभव करीत काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर यांनी विजय प्राप्त केला. उमेदवारी दाखल करताना झालेली दर्दी व गर्दी यामध्ये ही चर्चा विशेषत्वाने होत होती. बहुतेक याच कारणाने मुनगंटीवार यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करताना झालेल्या गर्दीची व दर्दीची आज चर्चा होऊन राहिली आहे.