BJP: भाजपा नेते वसंत वारजूरकरांवर कारवाई नाही; जिल्हाध्यक्षांची माहिती

Bhairav Diwase

चंद्रपूर:- बंडखोरी करून भाजपा महायुतीच्या उमेदवाराविरुद्ध निवडणूक लढविणाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात येईल असे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले होते. त्यावेळी ब्रह्मपुरी विधान विधानसभा क्षेत्रात भाजपचे प्रदेश कार्यकारणी सदस्य वसंत वारजुरकर यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली होती. परंतु त्यांनी निर्धारित वेळेच्या आत आपला नामांकन अर्ज मागे घेतला.

तसेच भाजपचे अधिकृत उमेदवार कृष्णा सहारे यांच्या उमेदवारीला समर्थन जाहीर केले. मात्र तांत्रिक चुकीमुळे प्रदेश भाजपच्या निष्कासित पदाधिकाऱ्यांच्या यादीमध्ये वसंत वारजूरकर यांचे नाव आले. पण वसंत वारजूरकर यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही. वारजूरकर हे भाजपाचे उमेदवार कृष्णा सहारे यांच्यासोबत प्रचार करीत आहेत, असे स्पष्टीकरण चंद्रपूरचे भाजप जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा यांनी दिले आहे.