BRS Party: बिआरएस पार्टीचा महायुतीत नसतानाही ना. सुधीर मुनगंटीवार यांना पाठींबा*

Bhairav Diwase
बीआरएसच्या जिल्हाध्यक्षानी प्रत्येक कार्यकर्त्याला दिली काम करण्याची सूचना
चंद्रपूर:- तेलंगणातील भारत राष्ट्र समितीने ना.सुधीर मुनगंटीवार यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. ना.सुधीर मुनगंटीवार हे बल्लापूरमधून महायुतीचे उमेदवार आहेत. गेल्या 30 वर्षांपासून ना. मुनगंटीवार हे आमदार आहेत. सहा टर्म पूर्ण करणाऱ्या ना.मुनगंटीवार यांनी बल्लारपूरच नव्हे तर संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्याचा कायापालट केला. त्यांनी केलेल्या चौफेर विकासामुळं चंद्रपूरचं नाव आता जगाच्या नकाशावर आलं आहे. त्यामुळं महायुतीत नसतानाही बीआरएस ना.मुनगंटीवार यांच्यासोबत आली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या काळात काँग्रेसमधून मोठ्या प्रमाणावर नेते आणि पदाधिकाऱ्यांनी ना.मुनगंटीवार यांचं नेतृत्व स्वीकारत भाजपमध्ये प्रवेश घेतला. हा क्रम अद्यापही विधानसभा निवडणुकीत कायम आहे. अशातच भारत राष्ट्र समितीनंही ना.मुनगंटीवार यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे. पार्टीचे जिल्हाध्यक्ष वमशीक्रिष्णा अरकिल्ला यांनी पाठिंब्याचे पत्र ना.सुधीर मुनगंटीवार यांना दिलं आहे. याशिवाय भारत राष्ट्र समितीच्या जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनाही त्यांनी ना.मुनगंटीवार यांच्या पुढाकारात भाजपाच्या सहाही विधानसभेच्या उमेदवारांसाठी कार्य करण्याबाबत सूचना दिली आहे.

कार्यकर्त्यांमध्ये उत्साह

सलग सहा टर्मनंतर ना.सुधीर मुनगंटीवार आता सातव्यांना निवडणुकीसाठी सज्ज झाले आहेत. त्यांना बल्लारपूरच नव्हे तर चंद्रपूर जिल्ह्यातून व्यापक पाठिंबा मिळत आहे. गावागावांमध्ये ना.मुनगंटीवार यांना नागरिक आणि माता-भगिनींकडून व्यापक प्रतिसाद मिळत आहे. अलीकडेच वेगवेगळ्या गावांमधील महिलांनी भाऊबिजेनिमित्त ना.मुनगंटीवार यांना औक्षण केलं. प्रचार दौरा, रॅली, सभांमध्ये ना.मुनगंटीवार यांना असे अनेक मतदार भेटत आहेत, ज्यांच्यासाठी त्यांनी काही ना काही केले होते. त्यामुळं जवळपास सर्वच ठिकाणी लोकांना भावनिक क्षण अनुभवायला मिळत आहेत.

विकासाला प्राधान्य

जातपात, धर्म, पंथ असा कोणताही भेद न पाळता ना.सुधीर मुनगंटीवार हे केवळ विकासाला प्राधान्य देतात. त्यांच्या कामाचा आवाका प्रचंड आहे. अर्थमंत्री, वनमंत्री, सांस्कृतिक कार्य मंत्री, मत्सव्यवसाय मंत्री म्हणून त्यांनी महाराष्ट्रासाठी दिलेलं योगदान व्यापक आहे. पालकमंत्री म्हणून त्यांनी चंद्रपूर जिल्ह्याचा कायापालटच केला आहे. त्यामुळं अशा नेत्याला पाठिंबा देताना भारत राष्ट्र समितीला आनंदच होत असल्याची प्रतिक्रिया चंद्रपुरातील कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. बीआरएसनं दिलेल्या या पाठिंब्यामुळं भाजपच्या कार्यकर्त्यांमध्येही उत्साहाचे वातावरण आहे. त्यामुळं आता ना.मुनगंटीवार यांच्या प्रचारात भाजपच्या कार्यकर्त्यांसोबत भारत राष्ट्र समितीचे पदाधिकारी, कार्यकर्तेही सहभागी होणार आहेत. त्यातून बल्लापूर विधानसभा मतदारसंघात ना.सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारात आणखी रंगत येणार असल्याचं दिसत आहे. आधीच व्यापक असलेला हा प्रचार आता आणखी जोशपूर्ण होणार आहे.