चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्ह्यात सुधीर मुनगंटीवार यांनी पुन्हा एकदा आपला राजकीय करिष्मा दाखवला आहे. त्यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वामुळे भाजपने जिल्ह्यात इतिहास घडवत सर्वाधिक जागांवर विजय मिळवला आहे.
भाजपचा विजय....
1. चंद्रपूर विधानसभा: किशोर जोरगेवार – 22,804 मतांनी विजय
2. राजुरा विधानसभा: देवराव भोंगळे – 3,054 मतांनी विजय
3. चिमूर विधानसभा: बंटी भांगडिया – 9,853 मतांनी विजय
4. वरोरा विधानसभा: करण देवतळे – 15, 450 मतांनी विजय
5. बल्लारपूर विधानसभा: सुधीर मुनगंटीवार (भाजप): स्वतःच्या मतदारसंघात 25,985 मतांनी विजय
कॉंगेसचा विजय
ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रात विजय वडेट्टीवार हे एकमेव काँग्रेसचे आमदार ठरले. वडेट्टीवार 13,971 मताने विजयी झाले.
सुधीर मुनगंटीवार यांनी केवळ स्वतःच्या विजयावर भर न देता संपूर्ण जिल्ह्यात भाजपचे जाळे पसरवले. त्यांच्या धडाडीने जिल्ह्यातील काँग्रेसला जबर धक्का बसला.
किंगमेकर सुधीरभाऊ:
चंद्रपूर जिल्ह्यातील प्रत्येक भाजप उमेदवाराचा विजय ही सुधीर मुनगंटीवार यांची ताकद, रणनीती, आणि जनतेतील लोकप्रियता सिद्ध करणारी आहे. जिल्ह्यातील ही निवडणूक त्यांच्या किंगमेकर पदावर शिक्कामोर्तब करणारी ठरली आहे.