चंद्रपूर:- बल्लारपूर-मूल विधानसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची लढत काँग्रेसचे उमदेवार संतोष रावत आणि काँग्रेसच्या बंडखोर उमेदवार डॉ.अभिलाषा गावतुरे यांच्याशी झाली. महायुतीचेच सरकार पुन्हा एकदा येणार असा दावा सुधीर मुनगंटीवार यांनी केला आणि तो खरा ठरला बल्लारपूर विधानसभा मतदारसंघातून मुनगंटीवार यांनी 25,985 मतांनी विजय मिळविला.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल अनेकांसाठी धक्कादायक असा होता. महायुती 230 जागांवर तर महाविकास आघाडी 46 जागां जिंकल्या आहे. अपक्ष आणि इतर पक्षांसह इतर उमेदवार 12 जागांवर विजय मिळविला. चित्र पुरेसं स्पष्ट झाले असून विधानसभेमध्ये महायुतीची सत्ता असणार आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा काल निकाल लागला. यात महाविकास आघाडीचा दारूण पराभव झाला.
अर्थातच, आता सर्वांत मोठा प्रश्न उभा राहिलेला आहे तो मुख्यमंत्रिपदाचा! महायुतीमधील भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तीन पक्षांपैकी कुणाला मुख्यमंत्रिपद मिळणार आणि कोण उपमुख्यमंत्रिपदी राहणार, हा प्रश्न महत्त्वाचा ठरणार आहे. भाजपाने सर्वात जास्त जागा जिंकत मोठा पक्ष राहिला आहे. त्यामुळे युतीधर्मानुसार भाजपाकडे मुख्यमंत्री पद जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मुख्यमंत्री पदासाठी भाजपा कुणाचा चेहरा समोर करतील हे पहावे लागतील.
ना . मुनगंटीवार यांनी गेल्या दहा वर्षांमध्ये बल्लारपूर विधानसभा मतदारसंघाचा चेहरामोहरा त्यांनी बदलवला. त्यामुळे जनतेने त्यांना कौल दिल्याचे आता सिद्ध झाले आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील प्रत्येक भाजप उमेदवाराचा विजय ही सुधीर मुनगंटीवार यांची ताकद, रणनीती, आणि जनतेतील लोकप्रियता सिद्ध करणारी आहे. जिल्ह्यातील ही निवडणूक त्यांच्या किंगमेकर पदावर शिक्कामोर्तब करणारी ठरली आहे. 7 व्यादा सुधीर मुनगंटीवार हे विधानसभेवर गेले आहे. मुनगंटीवार यांनी महाराष्ट्र भाजपा प्रदेशाध्यक्ष म्हणून काम पाहिलं आहे. तर मंत्रिमंडळात अर्थ, वने , नियोजन, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्रीपदाचा कारभार यशस्वीपणे सांभाळला. पक्षाने आत्तापर्यंत त्यांना दिलेल्या जबाबदारीचे त्यांनी सोने केले. त्यामुळे सुधीर मुनगंटीवार भाजपाकडून मुख्यमंत्री पदासाठी चेहरा राहु शकेल, अशी राजकीय वर्तुळामध्ये चर्चा आहे. मुनगंटीवारांना कोणतीही जबाबदारी दिली तरी ती पूर्णपणे यशस्वीरित्या पार पाडतात याचा कार्यकर्त्यांना विश्वास आहे म्हणून कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.