Expulsion from Congress: काँग्रेसकडून मोठी कारवाई, १६ बंडखोर उमेदवारांची पक्षातून हकालपट्टी

Bhairav Diwase

डॉ. गावतुरे आणि झोडे यांचा समावेश!
मुंबई:- विधानसभा निवडणुकीमध्ये अनेक ठिकाणी महाविकास आघाडीतील दुसऱ्या पक्षाने उमेदवार देऊन देखील इच्छुक असणाऱ्या काँग्रेसच्या उमेदवारांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केले. अशा बंडखोरांविरोधात काँग्रेसने कारवाई केली आहे.

काँग्रेसने रविवारी बंडखोरी करत विधानसभा निवडणूक लढवणाऱ्या १६ उमेदवारांवर कडक कारवाई केली आहे. या १६ बंडखोर उमेदवारांना ६ वर्षांसाठी काँग्रेसकडून निलंबन करण्यात आले आहे. महाराष्ट्र काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांच्या सूचनेनुसार ही कारवाई करण्यात आली आहे. काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांनी महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवारांविरोधात निवडणूक लढवणाऱ्या काँग्रेसच्या १६ बंडखोर उमेदवारांना सहा वर्षांसाठी निलंबित केले आहे.

डॉ. अभिलाषा गावतुरे यांनी कॉंगेसकडून बल्लारपूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास इच्छुक होत्या मात्र ऐनवेळी कॉंगेसने संतोषसिह रावत यांना अधिकृत उमेदवारी दिली. त्यामुळे डॉ. अभिलाषा गावतुरे यांनी कॉंगेसमधून बंडखोरी करीत अपक्ष उमेदवार अर्ज दाखल केला. तर राजु झोडे यांनी कॉंगेसकडून चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास इच्छुक होत्या मात्र ऐनवेळी कॉंगेसने प्रविण पडवेकर यांना अधिकृत उमेदवारी दिली. त्यामुळे राजु झोडे यांनी कॉंगेसमधून बंडखोरी करीत अपक्ष उमेदवार अर्ज दाखल केला. त्या महाराष्ट्र कॉग्रेसने या दोन्हीची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.