Join BJP: 150 कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश - आधार न्युज नेटवर्क

आधार न्युज नेटवर्क

०४ एप्रिल २०२० पासून वाचकांच्या सेवेत....

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here

Post Top Ad

Responsive Ads Here

सोमवार, नोव्हेंबर ११, २०२४

Join BJP: 150 कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश


बल्लारपूर:- बल्लारपूर विधानसभा मतदारसंघातील पोंभुर्णा तालुक्यात वेळवा आणि चकठाणा या दोन गावांमधील 150 कार्यकर्त्यांनी काँग्रेस व शिवसेना (ठाकरे गट) पक्षाला रामराम ठोकून भाजपमध्ये प्रवेश केला. या घटनेमुळे महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे.

गेल्या पंधरा दिवसांत बल्लारपूर विधानसभा मतदारसंघामध्ये शेकडो कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी काँग्रेसला रामराम ठोकून भाजपमध्ये प्रवेश केला. काँग्रेसला लागलेली गळती अजूनही कायम आहे. यात आता ठाकरे गटाचे कार्यकर्ते पक्ष प्रवेश करीत आहे. 150 जणांनी भाजपमध्ये प्रवेश करताच महाविकास आघाडीसाठी अडचणी निर्माण झाल्या आहेत.

वेळवा आणि चकठाणा या दोन गावांमधील एकूण 150 जणांनी ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश केला आहे. मौजा वेळवा आणि चकठाणा येथील युवकांनी काँग्रेस व शिवसेनेतून (ठाकरे गट) भारतीय जनता पक्षामध्ये ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते पक्षप्रवेश घेतला. शिवसेना ठाकरे गटाचे नयन मोरे या युवा नेत्याच्या माध्यमातून वेळवा येथिल कार्यकर्त्यांनी भाजपा मध्ये पक्ष प्रवेश घेतला. यावेळी पोंभुर्णा तालुक्यातील प्रमूख सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages