PM Narendra Modi: महाविकास आघाडी म्हणजे भष्ट्राचाराची खिलाडी

Bhairav Diwase
चिमूर:- काॅंग्रेस व त्याचा मित्रपक्षांच्या आघाडीवाल्यांची विकासकामांना ब्रेक लावण्यात पीएचडी आहे. महाराष्टात अडीच वर्षात वाधवण पाेर्ट, मेट्राे, समृद्धीमध्ये अडचणी आणल्यात, या याेजना पुर्ण हाेउ नये असे प्रयत्न केले विकासकामांबाबत अटकाना, लटकाना भटकाना यावर काॅंग्रेसची तर डबल पीएचडी आहे असा घणाघात पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चिमूर येथे भाजपा उमेदवारांच्या प्रचारार्थ सभा घेतली. यावेळी त्यांनी महायुतीने आयाेजित केलल्या सभेचे काैतुक करून विजयाचा विश्वास व्यक्त केला. यावेळी त्यांनी काॅंग्रेसवर जाेरदार टिका केली. काँग्रेसने आदिवासी समाजाला विभागून आपली राजकीय स्वार्थ साधण्याचा आरोप केला.

काॅंग्रेस हिंसा आणी अलगाववाद वर राजकीय पाेळया भाजतात, जम्मू कश्मीरच्या विधानसभेत जे घडले ते सर्वांनीच पाहिले ३७० संपवून भारताच्या संविधानसाेबत नाते जाेडले. संविधानाची माळा जपणाऱ्या लाेकांनी सात दशकापासून बाबा साहेबांनी दिलेल्या संविधानाची अमंलबजावणी केली नाही, जाे पर्यंत माेदी आला नाही ताे पर्यंत दाेन संविधान चालत हाेते तेथील हायकाेर्टचा जज, मुख्यमंत्री भारताच्या संविधानावर शपथ घेत नव्हता ३७० ची भीती हाेती ही बाबासाहेबांच्या संविधानाला कश्मीर मध्ये घूसू देत नव्हते तुमच्या आर्शीवादाने आम्ही जमिनीत गाडले आता काॅंग्रेसला ते सहन हाेत नाही त्यामुळे आता पुन्हा ३७० लागु करण्याचा प्रस्ताव विधानसभेत आणत आहेत. त्यांना जाब विचारा ते पाकिस्तानाच्या इच्छेनुसार वागत आहेत. असा सवाल पंतप्रधानांनी जनतेला विचारायला दिला आणि विकासात अडथळे आणणारी सत्ता पुन्हा येऊ नये, अशी जनतेला विनंती केली.