मुंबई:- राज्यात विधानसभा निवडणुकीनंतर सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. महायुतीला बहुमत मिळालं असून मुख्यमंत्रिपदाचा पेच अद्याप सुटलेला नाही. सर्वात मोठा पक्ष ठरलेला भाजप त्यांचा मुख्यमंत्री करण्याच्या तयारीत आहे.
मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत देवेंद्र फडणवीस यांचं नाव आघाडीवर आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंगळवारी राज्यपालांकडे राजीनामा सोपवला आहे. मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर एकनाथ शिंदे हे काळजीवाहू मुख्यमंत्री नेमणूक करण्यात आली आहे.