राजुरा:- राजुरा तालुक्यातील माथरा येथे गावकऱ्यांच्या सहयोगातून आयोजित केलेल्या भव्य जंगी इनामी शंकरपटाच्या उद्घाटनीय कार्यक्रमात राजुरा विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार देवराव भोंगळे यांनी शंकरपटाच्या उद्घाटनावेळी शेकडा हाकलण्याचा आनंद लुटला.
बैलगाडी हाकलणे आणि शेकडा हाकलणं यात खुप फरक असतो. शेकड्याला जुंपलेले बैल तुफान असतात. पटाचे बैल असल्यानं ते सैराट सुटतात. शेकडा हाकलण्यासाठी मजबूत बांध्याचे कातकर हवेत. कातकर होण्यासाठी हिंमत लागते. ही हिंमत आमदार भोंगळे यांनी दाखवत उद्घाटनावेळी त्यांनी शेकडा हाकलला.
शंकरपटाचा आनंद काही औरच असते; त्याची अनुभूती आज शेकडा हाकतांना आली. या भागात शेती व शेतकरी यांच्या हितासाठी काम करण्यावर माझं भर राहील यासोबतच येत्या काळात याच भागात राज्यस्तरीय शंकरपटाचे आयोजनही आपण करू असा विश्वास याठिकाणी बोलतांना व्यक्त केला.
यावेळी तालुकाध्यक्ष सुनील उरकुडे, तालुका महामंत्री दिलीप गिरसावळे, माथऱ्याचे सरपंच हरिदास झाडे, प्रशांत गुंडावार, अतुल चहारे, किशोर पंदिलवार, अर्जुन पायपरे, दिनेश ढेंगळे, वामन चहारे, गणपती झाडे, महादेव ताजणे, दादाजी चहारे, अजय चहारे, अनिल डाखरे, देविदास वांढरे, वैभव लांडे यांचेसह मोठ्या संख्येने स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.