चंद्रपूर:- चंद्रपूर येथील ब्रह्मपुरी मतदारसंघातील सावली तालुक्यातील आकापूर या गावात शिवानी वडेट्टीवार यांची प्रचार सभा झाली. या गावात अनेक दिवसांपासून वीज पुरवठा खंडित होत असल्याचे निदर्शनास आले. जेव्हा शिवानी वडेट्टीवार गावात पोहोचल्या, तेव्हाही वीज गेलेली होती, त्यामुळे त्यांनी मोबाईलच्या टॉर्चच्या प्रकाशात सभा घेतली. यावेळी त्यांनी महावितरणच्या कर्मचाऱ्यांना शिव्यांची लाखोली वाहिल्याचे समोर आले आहे.
शिवानी वडेट्टीवार म्हणाल्या, तुमचे जीवन अंधारात टाकायचे काम भाजप सरकार करत आहे. महावितरणवाल्याला झापणार तर आहे, त्याची नाही काढली तर माझं नाव शिवानी विजय वडेट्टीवार नाही. याभो#@#चे रात्रभर वीज घालवूनही यांना 800-1000 रुपये बील पाठवायला सा#@#ना लाज वाटत नाही. असे त्यांनी भर सभेत वक्तव्य राजकीय पक्षाच्या नेत्यांकडून महावितरण विभागाबद्दल शिवीगाळ केल्यामुळे इलेक्ट्रिसिटी लाईनस्टाफ असोसिएशन तर्फे जाहीर निषेध करण्यात आला. मा. कार्यकारी अभियंता, स.व सु विभाग कार्यालय, ब्रह्मपूरी यांना निवेदन देण्यात आले.