'ये लडके को मैने सुना, मुझे नही लगता अगली बार मुझे भाषण देणे चंद्रपूर आना पडेगा, ये लडका आगे बहोत तरक्की करेगा!' अटलबिहारी वाजपेयी यांचे हे उद्गार आहेत. त्यांनी चंद्रपूरच्या क्लब ग्राऊंडवर झालेल्या विशाल सभेत त्यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना आपल्या भावना व्यक्त केल्यात. श्रध्देय अटलबिहारी वाजपेयी यांनी ज्या तरूणाच्या संदर्भात हे मत व्यक्त केले, ते व्यक्तीमत्व म्हणजे, चंद्रपूर जिल्हयांचे लाडके लोकनेते नाम. सुधीरभाऊ मुनगंटीवार!
चंद्रपूर लोकसभा निर्वाचन क्षेत्रात तत्कालीन जनसंघापासूनचे भाजपा नेते अॅड. दादा देशकर सतत पराभूत होत असल्यांने, 1989 च्या लोकसभा निवडणूकीत भारतीय जनता पार्टी व शिवसेना युतीने सुधीर मुनगंटीवार या तरूणांवर डाव खेळला. सुधीर मुनगंटीवार हे नांव नवखे होते. भाजपाच्या दुसर्या—तिसर्या फळीतील होते. त्यांचे प्रचारासाठी, खुद्द अटलबिहारी वाजपेयी चंद्रपूरात आलेत. चंद्रपूरला क्लब ग्रॉउंडवर त्यांनी भव्य सभा झाली. अटल बिहारी वाजपेयी हे त्यांचे अमोघ वक्तृत्वाकरीता देश—विदेशात प्रसिध्द होते. अटल बिहारी वाजपेयीच्या आधी उमेदवार म्हणून सुधीर मुनगंटीवार यांचे भाषण झाले. तरूण सुधीर मुनगंटीवार यांनी वाजपेयी यांचे समोर, तडाखेबंद भाषण करून, मतदारांना आपल्यातील वक्तृत्वाची जाणीव करून दिली.
सुधीर मुनगंटीवार यांचे भाषण शैलीने अचंभित होत, अटल बिहारी वाजपेयी यांनी आपल्या भाषणात, 'अब मुझे आगेसे चंद्रपूरमें आने की जरूरत नही होगी, ये लडके को मैने सुना, मुझे नही लगता अगली बार मुझे भाषण देणे चंद्रपूर आना पडेगा, ये लडका आगे बहोत तरक्की करेगा!' असे विधान करताच, क्लब ग्राउंडवर टाळ्यांचा कळकळाट झाला.
1989 मध्ये विद्यार्थी दशेत असतांना सुधीर मुनगंटीवार यांना त्यावेळचे दिग्गज खासदार शांताराम पोटदुखे यांचे विरोधात भारतीय जनता पार्टी—शिवसेनेने अधिकृत उमेदवारी जाहीर केली होती. खासदार शांताराम पोटदुखे यांचे सरदार पटेल महाविद्यालयात त्यावेळी सुधीर मुनगंटीवार शिक्षण घेत होते. विद्यार्थाने गुरू विरोधात लढलेली ही निवडणूक चांगलीच गाजली होती. 1989 मध्ये चंद्रपूर लोकसभा निर्वाचन क्षेत्रात चंद्रपूर जिल्हयातील मूल, चंद्रपूर, राजुरा, वरोरा या चार मतदार संघासह गडचिरोली जिल्हयातील अहेरी आणि सिरोंचा या दोन मतदार संघाचा समावेश होता. या निवडणूकीत कॉंग्रेस, भाजपा, भारतीय रिपब्लीकन पक्ष अशी तिहेरी लढत झाली. या लढतीत अहेरी येथील एका सभेत कॉंग्रेसचे उमेदवार शांताराम पोटदुखे यांनी 'तुम्हाला मी आवडत नसेल, माझा पक्ष आवडत नसेल तर, तुम्ही सुधीर मुनगंटीवार यांना मत द्या, तो चांगला मुलगा आहे' असे जाहीर वक्तव्य केले होते.
या त्यांच्या भाषणाचीही चांगलीच चर्चा माध्यमात झाली होती. या निवडणूकीत शांताराम पोटदुखे यांना 2,43,853 (40.41%), सुधीर मुनगंटीवार यांना 1,93,397 (31.82%) भारीपचे राजे विश्वेश्वरराव महाराज यांना 60,270 (9.92%) मते मिळाली होती. पहिल्या निवडणूकीत मुनगंटीवार यांना पराभव पत्करावा लागला होता, मात्र आपल्या वक्तृत्व आणि सुस्वभावाने त्यांनी आपल्या वरिष्ठ नेत्यांसह, विरोधकांनाही आपलेसे केले होते. त्यांचा हाच सुस्वभाव आजवर कायम राहील्यांने, जनतेच्या ओठी आता 'या मातीच्या सेवेसाठी यावा सुधीरभाऊ' हे गाणं गुणगुणतांना दिसत आहे.
अटलबिहारी वाजपेयींची भविष्यवाणी खरी ठरली.......
१९८९ प्रचार सभेसाठी अटलबिहारी वाजपेयी चंद्रपुरला आले होते. मंचावरील सर्व नेत्यांची भाषणे होता होता बराच वेळ निघून गेला. तेवढ्यात वाजपेयींचे आगमन झाले. येताच त्यांना भाषणासाठी पाचारण करण्यात आले, पण ते म्हणाले की, 'उम्मीदवार का भाषण हुवा की नहीं?', त्यावर त्यांना नकारार्थी उत्तर मिळाले. तेव्हा ते म्हणाले, 'नहीं. पहीले उम्मीदवार का भाषण होना चाहिये. वक्त की किल्लत है, लेकीन पांच मिनट आप उम्मीदवार का भाषण किजीये.' असं म्हटल्यावर सुधीरभाऊ भाषणासाठी उभे झाले आणि केवळ साडेतीन मिनीटांत तडाखेबाज भाषण ठोकले. वाजपेयी त्यांच्या भाषणाने अत्याधिक प्रभावित झाले आणि स्वतः भाषणासाठी उभे झाले तेव्हा म्हणाले की, 'ये लडका बहुत आगे बढेगा. आगे जाकर समूचे महाराष्ट्र में भाजप का नेतृत्व करेगा.' त्यानंतर २१ वर्षांनी २ एप्रिल २०१० ला सुधारभाऊ भाजपचे प्रदेशाध्यक्ष झाले आणि वाजपेयींची भविष्यवाणी खरी ठरली.