चंद्रपूर:- विधानसभा निवडणुकीत विकासाला प्राधान्य देत भाजपा महायुती सरकारला ईश्वररुपी मतदात्यांनी भरघोस यश प्राप्त करून दिले. केंद्रातील मोदी सरकार यांनी मागील अड्डीच वर्षात जनकल्याणा करिता राबविण्यात आलेल्या योजनांमुळे जनतेमध्ये विश्वास निर्माण झाला होता कि भाजपा महायुती सरकारचं जनतेला न्याय देवु शकते,तसेच पालकमंत्री मा.ना.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी चंद्रपूर जिल्ह्यात केलेल्या असंख्य विकास कामांमुळे मतदारांनी भाजपा महायुतीच्या उमेदवाराला भरघोस मतांचा वर्षाव करित जिल्ह्यात सहा मतदार संघापैकी पाच मतदार संघात विजय मिळवुन दिला. मतदात्यांनी आशीर्वादरुपी केलेल्या मतदानाबद्दल मनपुर्वक आभार.
भाजपा महायुतीच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या अथक प्रयत्नांच्या पराकाष्टेमुळे विजय सरस होऊ शकला. तसेच प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष स्वरुपात पक्षाच्या विजयासाठी ज्यांनी अथक प्रयत्न केले आणि विजयश्री खेचून आणला अशा सर्व प्रयत्नाची पराकाष्टा केलेल्या कार्यकर्त्यांचे देखिल मनपुर्वक आभार.. सोबतच नवनिर्वाचित आमदार विकास पुरुष सुधीरभाऊ मुनगंटीवार जी, मा.आ. बंटी भांगडिया जी, मा.आ. किशोर जोरगेवार जी, मा.आ. देवरावजी भोंगळे, मा.आ. करणजी देवतळे यांचे मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा.