चंद्रपूर:- आज मुंबईत झालेल्या एका बैठकीत सुधीर मुनगंटीवार यांनी पोंभुर्णा येथे प्रस्तावित लक्ष्मी मित्तल समुहाच्या पोलाद कारखान्याच्या उभारणीसंदर्भात आढावा घेतला. या कारखान्याच्या उभारणीत आलेल्या अडचणी त्वरित दूर करून हा कारखाना लवकरात लवकर सुरू होण्यासाठी वेगाने पावले उचलण्याचे निर्देश वन विभाग, उद्योग विभाग तसेच अन्य संबंधित विभाग व जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.
या बैैठकीस वन विभागाचे प्रधान सचिव श्री वेणुगोपालजी रेड्डी यांच्यासह अन्य वरीष्ठ अधिकारी तसेच आर्सेलर मित्तल उद्योगाचे कंपनी सल्लागार श्री राजेंद्रजी तोंडापूरकर उपस्थित होते. लवकरात लवकर हा प्रकल्प सुरू होईल असा विश्वास सुधीर मुनगंटीवार व्यक्त केला आहे.
पोंभुर्ण्यातील पाच हजार एकरवर होणारा हा आशियातील सर्वात मोठा पोलाद प्रकल्प असेल आणि थेट व अप्रत्यक्ष मिळून सुमारे साठ हजार रोजगार या पोलाद प्रकल्पातून निर्माण होतील.