torture: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या २४ वर्षीय तरुणीला रूमवर नेऊन अत्याचार

Bhairav Diwase

पुणे:- स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी पुण्यात आलेल्या एका २४ वर्षीय तरुणीची ओळख एका तरुणासोबत झाली. संबंधित तरुणाने तरुणीला प्रेमाची विचारणा करून, त्यानंतर लग्नासाठी विचारणा केली.

तिला एका भाड्याच्या खोलीवर नेऊन लग्न करणार असल्याचे सांगून तिच्यावर जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी पीडित तरुणीने तक्रार दिल्यानंतर आरोपी तरुण व त्याचे चार मित्र यांच्या विरोधात विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डिसेंबर २०२० ते सप्टेंबर २०२४ या दरम्यान संबंधित प्रकार घडला आहे. संबंधित तरुणाने तरुणीशी ओळख निर्माण करून तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर लग्न करण्याचे भासवून तिला एका रूमवर बोलावून घेतले. त्यानंतर तिच्या संमतीशिवाय जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. तसेच आरोपीच्या मित्रांनी रूमचा दरवाजा बाहेरून बंद करून त्यास मदत केली. तरुणीने आरोपीस लग्नाची विचारणा केली असता, आरोपीने तिला शिवीगाळ, मारहाण करून लग्न करण्यास नकार दिला. तसेच आरोपींनी तरुणीला फोनद्वारे झाले ते कोणाला सांगू नको, असे म्हणून जिवे मारण्याची धमकी दिली आहे. याप्रकरणी महिला पोलीस उपनिरीक्षक एन. पें पेंढरकर पुढील तपास करीत आहेत.