Wushu Competition : राज्यस्तरीय वुशु स्पर्धेत चंद्रपूर जिल्ह्यातील खेळाडू ठरले अव्वल

Bhairav Diwase
🛜
चंद्रपूर:- ऑल महाराष्ट्र वुशु संघटना महाराष्ट्र राज्य परभणी जिल्हा वुशु संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय वुशु स्पर्धा दिनांक 14 ते 17 नोव्हेंबर 2024 या कालावधीत सेलू जि. परभणी या ठिकाणी आयोजित करण्यात आल्या या स्पर्धेत चंद्रपूर जिल्ह्यातील एकूण 5 खेळाडूंनी सहभाग नोंदविला.

🌄
उत्कृष्ट प्रदर्शन करीत सब-जुनियर गटात प्रीथवीर उमेश सहारे याने 7 -12 वयोगटात सुवर्णपदक प्राप्त केले तर मुलींमध्ये विधीका संदीप सहारे हिने कांस्यपदक प्राप्त केले. ज्युनिअर वुशु राज्यस्तर स्पर्धेत चंद्रपूरची नयन पाटील हिने मुलींच्या वयोगटात कास्य पदक प्राप्त केले. त्याचप्रमाणे ज्युनियर वुशु राज्यस्तर स्पर्धेत करण रामलाल यादव 45 किलो वजन गटात तर मेहुल अमय रायपुरे याने 56 किलो वजन गटात सहभाग नोंदविला.
🌄

वरील सर्व खेळाडूंनी उत्कृष्ट प्रदर्शन करीत चंद्रपूर जिल्ह्याचे नावलौकिक केले तसेच विजय खेळाडूंमधील पृथवीर उमेश सहारे हा पंजाब मधील अमृतसर येथे होणाऱ्या राष्ट्रीय वुशु स्पर्धेसाठी त्याची निवड झाल्याबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे प्रित्विर हा चांदा पब्लिक स्कूल येथील इयत्ता दुसरी मधील विद्यार्थी असुन सब गटात राष्ट्रीय स्पर्धे करता निवड होणारा चंद्रपूर जिल्ह्यातील पहिला खेळाडू आहे त्याबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

🛜
विशेष अभिनंदन म्हणून श्री अविनाश पुंड जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रपूर श्री विनोद ठाकरे तालुका क्रीडा अधिकारी चंद्रपूर, श्री नंदू आवारे क्रीडा अधिकारी, श्री विजय डोबाळे राज्य क्रीडा मार्गदर्शक चंद्रपूर,चंद्रपूर जिल्हा वुशु संघटनेचे सचिव श्री विनय बोंडे त्याचे वडील उमेश सहारे आई प्रीती सहारे, श्री सुमित महारतळे मुख्य प्रशिक्षक व सहाय्यक प्रशिक्षक यांनी शुभेच्छा दिल्या..