घटनेची माहिती राजुराचे पोलीस निरीक्षक योगेश्वर पारधी यांना मिळताच त्यांनी आपल्या स्टाफसह घटनास्थळ पोचून मृतदेह ताब्यात घेतले व उपजिल्हा रुग्णालय राजुरा येथे उत्तरीय तपासाणीकरिता पाठविण्यात आले.
मृत भाऊराव सातपुते हा माणिकगड सिमेंट कंपनीमध्ये कामगार म्हणून काम करत होता तर देवराव सातपुते जिल्हा परिषद चंद्रपूर येथे लिपिक या पदावर कार्यरत होता. रविवारी दोघेही कामानिमित्त राजुरा येथे आले. सायंकाळी पाच वाजताच्या दरम्यान बाखर्डी येथे राजुरा-गडचांदूर मार्गे निघाले असता पांढरपौनी या गावाजवळ राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू आहे. त्या ठिकाणी खड्डे खोदण्याचे काम ट्रॅक्टरच्या माध्यमातून चालू आहे. पण सूचनाफलक नसल्यामुळे काम सुरू असलेल्या बाजूनेच मोटरसायकल नेली. दरम्यान बांधकाम सुरू असलेल्या रस्त्याचे कामावरील ट्रॅक्टर आणि मोटरसायकल यांच्यात जोरदार धडक झाली.