चंद्रपूर:- जम्मू-कश्मीरच्या पूंछ जिल्ह्यात मंगळवारी सायंकाळी भारतीय लष्कराचे वाहन दरीत कोसळून 5 जवान शहीद झाले. या अपघातात वरोरा तालुक्यातील पिंपळगाव मारोती या गावचे अक्षय दिगंबर निखुरे हा जवाना शहीद झाला आहे. वाहनामध्ये 18 जवान होते. पिंपळगाव मारोती या छोट्याशा खेड्यातील निखुरे कुटूंबातून अक्षय सह त्यांचे बंधूही सैन्यात भरती झालेत.
अक्षय हा बीए अंतीम वर्षाला शिक्षण घेत असतानाच भारतीय सैन्य दलात वयाच्या 21 व्या वर्षी म्हणजे, 2018 मध्ये रुजू झाला होता. त्याचे वडील अल्पभूधारक शेतकरी असून, वडील आणि आई दोघेही घरची चार एकर शेती करतात. अक्षयाच्या अपघाती निधनाने परिसरात दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मृतक जवानाच्या पार्थिवावर गुरूवारी स्वगावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.